सर्व विभागाने समन्वय राखून काम करावे- अप्पर जिल्हाधिकारी संजय जाधव पंढरपूर, दि. 20 : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कार्तिक वारी ही प्रतिकात्मक स्वरुपात करण्यात येणार आहे. ही वारी सुरळीत व सुरक्षित पार पाडण्यासाठी सर्व विभागाने समन्वय साधून योग्य नियोजन करावे अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी संजय जाधव यांनी दिल्या. कार्तिक वारी नियोजनाबाबत […]
ताज्याघडामोडी
सांगवी येथील नव्वद पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी दिला मदतीचा हात
सांगवी येथील नव्वद पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी दिला मदतीचा हात ‘डॉ.रोंगे सर शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्यातही अग्रेसर’ – सरपंच कांतीलाल गलांडे पंढरपूर- ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तंत्रशिक्षणाचे जाळे घट्ट विणणारे शिक्षणतज्ञ डॉ.बी.पी.रोंगे सर हे आता शिक्षणाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही आपली ओळख निर्माण करत आहेत. पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या या कठीण वेळी डॉ. रोंगे सरांनी केलेली […]
पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशिक्षण शिबीर जबाबदारी काटेकोरपणे पार पाडण्याच्या सूचना
पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशिक्षण शिबीर जबाबदारी काटेकोरपणे पार पाडण्याच्या सूचना पंढरपूर, दि. 19 : पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणुक यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी निवडणुक प्रक्रियेतील नियुक्त अधिकारी, कर्मचारी व संबधित यंत्रणेने सोपविलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी अशा सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या. निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण सांस्कृतिक भवन, […]
वसंतराव काळे शैक्षणिक संकुल वाडीकूरोली येथे Covid-19च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या परिपत्रकानुसार शाळा सुरू करण्यासंदर्भात विचारविनिमय बैठक संपन्न
वसंतराव काळे शैक्षणिक संकुल वाडीकूरोली येथे Covid-19च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या परिपत्रकानुसार शाळा सुरू करण्यासंदर्भात विचारविनिमय बैठक संपन्न. पंढरपूर प्रतिनिधी दि.१९- 23 नोव्हेंबर 2020 पासून शासनाच्या परिपत्रकानुसार शाळा सुरू करण्यासंदर्भात वसंतराव काळे शैक्षणिक संकुल वाडीकुरोली येथे *श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री कल्याणरावजी काळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली विचारविनिमय बैठक संपन्न झाली*. संस्थेचे सचिव मा.श्री. बाळासाहेब […]
संग्राम देशमुख यांना पंढरपूरातून भरघोस मताधिक्य देवू : आ. प्रशांत परिचारक पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुक २०२० पंढरपूर पदवीधर मेळावा
संग्राम देशमुख यांना पंढरपूरातून भरघोस मताधिक्य देवू :आ. प्रशांत परिचारक पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुक २०२० पंढरपूर पदवीधर मेळावा मागील अनेक निवडणुकीपासून पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. कायद्यातील सुयोग्य व्यवस्थेसाठी पदवीधरांनी मतदानाचा हक्क बजावत पुणे मतदार संघाचे भाजपा व मित्रपक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांना प्रथम पसंतीचे मत देउन निवडून द्यावे आणि त्यांचे विजयात पंढरपूरकर पदवीधरांनी भरघोस वाटा द्यावा आवाहन आ. प्रशांतराव परिचारक यांनी केले आहे. पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघाची सध्या निवडणुक लागली आहे. येत्या १ डिसेम्बर २०२० रोजी यासाठी पाच जिल्हातुन सुमारे ४.३० लाख मतदार मतदानाचा हक्क बाजवणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातून ५३००० मतदार आहेत. या निवडणुकीत भाजपाकडून संग्राम देशमुख निवडणुकींच्या रिंगणात आहेत. यानिमित्ताने पंढरपूरात पदवीधर मेळावा संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर सोलापूर जिल्ह्याचे मा.पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख , […]
वारकरी संप्रदायाच्या प्रस्तावानुसार कार्तिकी यात्रा पार पाडा
वारकरी संप्रदायाच्या प्रस्तावानुसार कार्तिकी यात्रा पार पाडा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची सरकारला सूचना ज्याला शेकडो वर्षांची संत परंपरा लाभली आहे. सांस्कृतिक आणि धार्मिक समतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायास परंपरेनुसार वारीसाठी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असून पंढरपूर येथील कार्तिकी वारीसाठी विविध सुविधा आणि सुरक्षेसाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार मर्यादित संख्येतील […]
राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्या वतीने माऊली बेघर निवास येथील आश्रितांना फराळ आणि महिलांना साडी वाटप
राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्या वतीने माऊली बेघर निवास येथील आश्रितांना फराळ आणि महिलांना साडी वाटप दीपावलीचा सण साजरा केला जात असताना समाजातील दुर्लक्षित घटकांची दिवाळी आनंदाची व्हावी यासाठी आज पंढरीत राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्या प्रदेश संघटक चारुशीला कुलकर्णी यांच्या वतीने येथील माउली बेघर निवास येथे आश्रितांना राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्या हस्ते फराळ वाटप तर […]
डिसेंबर २०२१ मध्ये होणार पंढरपूर नगर पालिकेची निवडणूक
डिसेंबर २०२१ मध्ये होणार पंढरपूर नगर पालिकेची निवडणूक वार्ड निहाय नगरसेवक निवडणूक तर नगरसेवकांमधून होणार नगराध्यक्ष निवड ? २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर आता सोलापूर जिल्ह्यातील नगर पालिका क्षेत्रातील जनतेला विशेषतः आजी आणि भावी नगरसेवकांना आता नगर पालिका निवडणुकांचे वेध लागले असून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर २०१९ मध्ये होणाऱ्या नगर पालिका व नगर […]
आता रोज २ हजार भाविकांना होणार विठुरायाचे मुखदर्शन
आता रोज २ हजार भाविकांना होणार विठुरायाचे मुखदर्शन ऑनलाईन नोंदणीसह नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रक्मिणी मंदिर भाविकांसाठी खूले करण्यात आले आहे. भाविकांची वाढती गर्दी व मागणी लक्षात घेता मंदिर समितीच्या वतीने बुधवारपासून दोन हजार भाविकांना दर्शनाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियम व अटींची अंमलबजावणी […]
नांदोरे येथील साठ पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी दिला मदतीचा हात ‘डॉ.रोंगे सरांमुळे ग्रामीण भागात तंत्रशिक्षणाचे जाळे पसरले -तंटामुक्तीचे अध्यक्ष रामचंद्र वाघ
नांदोरे येथील साठ पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी दिला मदतीचा हात ‘डॉ.रोंगे सरांमुळे ग्रामीण भागात तंत्रशिक्षणाचे जाळे पसरले -तंटामुक्तीचे अध्यक्ष रामचंद्र वाघ पंढरपूर- ‘शिक्षणतज्ञ डॉ.रोंगे सरांमुळे ग्रामीण भागात तंत्रशिक्षणाचे जाळे पसरले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची प्रगती झपाट्याने होत आहे. ’ असे प्रतिपादन तंटामुक्तीचे अध्यक्ष रामचंद्र वाघ यांनी केले. […]