ताज्याघडामोडी

 वसंतराव काळे शैक्षणिक संकुल वाडीकूरोली येथे Covid-19च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या परिपत्रकानुसार शाळा सुरू करण्यासंदर्भात विचारविनिमय बैठक संपन्न

 वसंतराव काळे शैक्षणिक संकुल वाडीकूरोली येथे Covid-19च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या परिपत्रकानुसार शाळा सुरू करण्यासंदर्भात विचारविनिमय बैठक संपन्न. 
पंढरपूर प्रतिनिधी दि.१९-   23 नोव्हेंबर 2020 पासून शासनाच्या परिपत्रकानुसार शाळा सुरू करण्यासंदर्भात वसंतराव काळे शैक्षणिक संकुल वाडीकुरोली येथे *श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री कल्याणरावजी काळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली विचारविनिमय बैठक संपन्न झाली*. संस्थेचे सचिव मा.श्री. बाळासाहेब काळे गुरुजी माजी प्राचार्य ज्येष्ठ ग्रामीण कथाकार श्री.शिवाजीराव बागल सर हे   उपस्थित होते.
      यावेळी बोलतांना कल्याणराव काळे म्हणाले की कोरोनाच्या महामारीमुळे  प्रत्यक्ष शाळा बंद असल्या तरी आपल्या शैक्षणिक संकुलात ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू होते . शासनाच्या परिपत्रकानुसार शाळा प्रत्यक्षपणे सुरू करत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्ण खबरदारी घेऊन शाळा सुरू कराव्यात तसेच सर्व विद्यार्थ्यांची दैनंदिन आरोग्य तपासणी करण्यासाठी सर्व शैक्षणिक संकुलातील संस्थांना थर्मलस्कॅनिंग, ऑक्सीमिटर ,हँड सॅनिटायजर इत्यादी आवशक्य सर्व सुविधा पुरवण्याची सोय केली आहे. तरी आपण विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्ण खबरदारी घेत प्रत्यक्षपणे शिक्षण सुरू करणे ही आपली जबाबदारीअसून  शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांची एकी हीच खरी ताकद असून एकत्रितपणे सर्वांनी सुसंवाद साधून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवावे असे आवाहन केले.
 यावेळी बोलताना संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे गुरुजी म्हणाले की प्रत्यक्ष शाळेची घंटा वाजणार असली तरी शिक्षकांची  जबाबदारी खूप मोठी आहे आपण सर्वांनी एकत्रितपणे सर्व खबरदारी घेऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती करणे गरजेचे आहे.शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आडी-अडचणी लक्षात घेऊन त्या सोडवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगितले.
यावेळी प्राचार्य श्री .एच आर जमदाडे प्राचार्य  श्री. शिवाजीराव शेंडगे प्राचार्य श्री. अनिल कोलगे  मुख्याध्यापक  श्री.दादासाहेब खरात सर वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य  श्री. संतोष गुळवे यांनीही  समायोचित  मनोगते व्यक्त केली.
तसेच यावेळी श्रीमंतराव काळे प्रशाला जैनवाडी- धोंडेवाडी या शाखेतील  सहशिक्षक श्री. संजय काळे यांची पंढरपूर तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल व बहुजन शिक्षक महासंघाचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सहशिक्षक श्री. नवनाथ गायकवाड यांना मिळाल्याबद्दल संकुलाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष मा. श्री कल्याणरावजी काळे साहेब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या विचार-विनिमय बैठकीसाठी वसंतराव काळे शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थिती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *