ताज्याघडामोडी

संग्राम देशमुख यांना पंढरपूरातून भरघोस मताधिक्य देवू : आ. प्रशांत परिचारक  पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुक २०२० पंढरपूर पदवीधर मेळावा 

संग्राम देशमुख यांना पंढरपूरातून भरघोस मताधिक्य देवू :आ. प्रशांत परिचारक 

पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुक २०२० पंढरपूर पदवीधर मेळावा 

मागील अनेक निवडणुकीपासून पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. कायद्यातील सुयोग्य व्यवस्थेसाठी पदवीधरांनी मतदानाचा हक्क बजावत पुणे मतदार संघाचे भाजपा व मित्रपक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांना प्रथम पसंतीचे मत देउन निवडून द्यावे आणि त्यांचे विजयात पंढरपूरकर पदवीधरांनी भरघोस वाटा द्यावा  आवाहन आ. प्रशांतराव परिचारक यांनी केले आहे.
पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघाची सध्या निवडणुक लागली आहे. येत्या १ डिसेम्बर  २०२० रोजी  यासाठी पाच जिल्हातुन सुमारे ४.३० लाख  मतदार मतदानाचा हक्क बाजवणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातून ५३००० मतदार आहेत. या निवडणुकीत भाजपाकडून संग्राम देशमुख निवडणुकींच्या रिंगणात आहेत. यानिमित्ताने पंढरपूरात पदवीधर मेळावा संपन्न झाला. 

याप्रसंगी व्यासपीठावर सोलापूर जिल्ह्याचे मा.पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख , भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख , कल्याणराव काळे , डॉ.बी.पी.रोगे , नगराध्यक्ष साधना भोसले, वसंतराव देशमुख , शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जितेंद्र पवार , सुभाषराव माने आदि मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. परिचारक म्हणाले , पदवीधर मतदारसंघासाठी पदवी धारण केलेले सुशिक्षित मतदार आहेत. आपले पुणे विभागातून श्री.संग्राम देशमुख यांचे माध्यमातून अगदी सुशिक्षित अणि अनेक सहकारी संस्थामधून रोजगार मिळवून देणारा उमेदवार लाभला आहे. श्री.देशमुख यांनी  सांगली  भागात अनेक सहकारी संस्था उभारून रोजगार निर्मिती उपलब्ध करून दिली आहे. पंढरपूर तालुक्यामधून सुमारे ६४०० इतके मतदार आहेत. यामधून पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये मोठे मताधिक्य देशमुख यांना मिळवून देण्यासाठी किमान ७५ टक्के मतदान होणे अपेक्षित असल्यांचेही मत यावेळी त्यांनी मांडले. 

   तसेच याप्रसंगी माजी मंत्री तथा आ. विजयकुमार देशमुख यांनीही देशमुख तसेच शिक्षक मतदारसंघात पवार यांना निवडून द्यायचे आहे आणि पुणे पदवीधर मतदारसंघाचा भाजपाचा असणारा अभेद्य बालेकिल्ला कायम ठेवायचा, असे आवाहन  केले.  

यावेळी भाजपा उमेदवार संग्राम देशमुख म्हणाले, सोलापूर जिल्हयाने कायमच सांगली जिल्हयातील आमच्या दुष्काळी पटटयाला मदत केली आहे. पूरस्थितीतही या जिल्हयातील अनेकांनी आमची गावे दत्तक घेतली आणि आमच्या परिसरातील जनतेला मदत केली. अगदी तशाच पध्दतीने येणöया निवडणुकीत मत रूपी मदतीचा आशीर्वाद देण्यांचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
प्रसंगी शिक्षक मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार जितेंद्र पवार यांनी , पंढरपूरात आपण प्रचारासाठी आलो आहे. परिचारकांच्या आशीर्वादाने विठठल आपणास पावणार आहे. नुकताच येथील सुभाष माने यांचे नेतृवाखाली  मुख्याध्यापक महासंघाने आपणास पाठींबा दिला आहे. आता आपला विजय निश्चित असल्यांचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी कल्याणराव काळे, डॉ बी.पी. रोगे आदिंनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रसंगी आभार हरिष ताठे यांनी मानले. तर सुत्रसंचालन सुरेश आगावणे यांनी केले आहे. यावेळी  सुभाष मस्के यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *