ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्या वतीने माऊली बेघर निवास येथील आश्रितांना फराळ आणि महिलांना साडी वाटप 

राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्या वतीने माऊली बेघर निवास येथील आश्रितांना फराळ आणि महिलांना साडी वाटप 

दीपावलीचा सण साजरा केला जात असताना समाजातील दुर्लक्षित घटकांची दिवाळी आनंदाची व्हावी यासाठी आज पंढरीत राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्या प्रदेश संघटक चारुशीला कुलकर्णी यांच्या वतीने येथील माउली बेघर निवास येथे आश्रितांना राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्या हस्ते फराळ वाटप तर महिलांना साडी वाटप करण्यात आले.         

यावेळी  प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य अतुल खरात, राष्ट्रवादी  ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा माळी, राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या तालुका अध्यक्षा अनिता पवार,राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्या प्रदेश संघटक चारुशीला कुलकर्णी,राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्या जिल्हा संघटक राधा मलपे यांच्यासह रॅबिनहुड आर्मीचे सर्व सदस्य उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *