ताज्याघडामोडी

वाहन चोरी केलीच केली अन् मुलीलाही पळवले; अल्पवयीन मुलांचे कारनामे

अल्पवयीन मुले विविध गुन्ह्यात सहभागी होताना दिसून येत आहेत. याच मालिकेत सक्करदरा पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह असलेल्या मुलीला ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी पाच दुचाकी  चोरल्याचे पुढे आले. सोबत असलेल्या मुलीलाही त्यांनी पळवून आणल्याही निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी मुलीला संबंधित पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सक्करदरा पोलिसांनी ही कावाई केली. सक्करदारा पोलिसांचे पथक […]

ताज्याघडामोडी

हसतं खेळतं कुटुंब पहाटेच्या भांडणामुळं संपलं, आईला पाहून लेकरांना धक्का, वडिलांना शोधलं अन्…

घरचे सर्वजण झोपेत असताना भल्या पहाटे पती-पत्नीमध्ये वाद झाला. तो वाद एवढा विकोपाला गेला की चक्क पतीने लाकडी पाट पत्नीच्या डोक्यात घातला. यामुळे वर्मी घाव बसल्याने ती रक्तबंबाळ होऊन कोसळली. हे पाहून पतीने पळ काढला. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारदरम्यान पत्नीचा नागपूर येथे मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी […]

ताज्याघडामोडी

उद्धव ठाकरे आमचे वकिल – प्रकाश आंबेडकर

मुंबईत उद्या तसंच परवा असे दोन दिवस INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण नाही. यावर आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही शिवसेनेसोबत आहोत. आम्हाला INDIA आघाडीचं निमंत्रण नाही. त्यामुळे ते जेव्हा निमंत्रण देतील तेव्हा आमची भूमिका स्पष्ट करु असं, प्रकाश आंबेडकर […]

ताज्याघडामोडी

स्वेरी फार्मसीच्या तब्बल २३ विद्यार्थ्यांची ‘रिलायन्स फार्मास्युटिकलस्’ या कंपनीत निवड

पंढरपूर- ‘रिलायन्स फार्मास्युटिकलस्’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी मधील तब्बल २३ विद्यार्थ्यांची ऑनलाईन कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.          फार्मसी क्षेत्राशी संबंधीत असलेल्या आणि मुख्य शाखा अहमदाबाद (गुजरात) येथे असलेल्या  ‘रिलायन्स फार्मास्युटिकलस्’ या नामांकित कंपनीच्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

काकाने वडिलांवर जादूटोणा केल्याचा संशय, पुतण्याने मध्यरात्री पेट्रोल ओतून घर पेटवून दिलं

जादूटोणा केल्याच्या संशयावरून पुतण्यानेच काकाचे घर पेटवून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. खल्लार येथील घटनेच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्याच्या तपासात ही धक्कादायक बाब उजेडात आली. या प्रकरणी आरोपी पुतण्यास अटक करण्यात आली आहे. अनिकेत विनायक वानखडे (२३) रा. गौरखेडा असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पुतण्याचे नाव आहे. खल्लार येथील रहिवासी पंडित प्रल्हादराव वानखडे (५१) यांचे गावाच्या […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड मध्ये “फुल स्टॅक डेव्हलपमेंट” या विषयावर व्हॅल्यू एडिशन प्रोग्रॅम संपन्न

पंढरपूर: प्रतिनिधी एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर येथील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी फुल स्टॅक डेव्हलपमेंट या विषयावरती व्हॅल्यू एडिशन प्रोग्रॅम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या असल्याची माहिती कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे यांनी दिली. या कार्यक्रमाचे उद्घाटन सुरज पवार प्राचार्य डॉ. कैलाश […]

ताज्याघडामोडी

सामान्य नागरिकांना मोठा दिलासा! घरगुती गॅस सिलेंडर 200 रुपये स्वस्त

रक्षाबंधनाच्या एक दिवसपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील गृहिणींना मोठी भेट दिली आहे. मोदी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची मोठी कपात जाहीर केली आहे. यासोबतच ७५ लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येणार असेही जाहीर केले. या निर्णयामुळे महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अलीकडच्या काळात गगनाला भिडलेल्या महागाईमुळे जनतेच्या अडचणी वाढल्या होत्या, मात्र […]

ताज्याघडामोडी

कर्जदार महिलेच्या घरी मद्यपी बँक कर्मचाऱ्यांचा राडा; अश्लील शिवीगाळ करत विनयभंग

कर्जाच्या थकलेल्या हप्त्यांची वसुली करण्यासाठी कर्जदाराच्या घरी गेलेल्या मद्यपी कर्मचाऱ्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून राडा घातला. त्या कर्मचाऱ्यांनी घरातील महिलांशी असभ्य वर्तन करून त्यांचा विनयभंग केला आणि त्यांना धमकावले. या प्रकरणी आरोपींवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. हा प्रकार आठ ऑगस्टला हडपसर येथील भेकराईनगर परिसरात घडला आहे. या प्रकरणी एका ४८ वर्षीय महिलेने हडपसर […]

ताज्याघडामोडी

फॅबटेकटेक्नीकल कॅम्पस मध्ये “तांत्रिक शिक्षणातील प्रकल्प मार्गदर्शकांची भूमिका” या विषयावर कार्यशाळा संपन्न

सांगोला : फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्च, च्या संशोधन आणि विकास विभागाने “तांत्रिक शिक्षणातील प्रकल्प मार्गदर्शकांची भूमिका” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. याप्रसंगी संशोधन आणि विकास विभागाचे प्रमुख डॉ. सुभाष व्ही.जाधव यांनी प्राध्यापकांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांकडून दर्जेदार संशोधन कार्य कसे करून घ्यावे, विद्यार्थ्यांच्या प्रकल्प उपक्रमाचा उपयोग समाजासाठी फायदेशीर उत्पादने तयार करण्यासाठी कसा करायचा आणि विद्यार्थ्यांचे संशोधन कार्य कसे प्रकाशित करायचे याविषयी त्यांनी प्राध्यापकांना  मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस चे सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. […]

ताज्याघडामोडी

आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी एकास मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी आरोपी नामे दिपक संभाजी काळे रा. येड्राव ता. मंगळवेढा यास मुंबई उच्च न्यालयाचे न्यायमुर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी की,- सदरील घटनेतील फिर्यादी नामे दिपक कुंडलिक ढावरे हा आहे.. फिर्यादी याचा भाऊ हनमंत ढावरे याचे एका महिलेशी संबंध असलेचा संशय होता. या संबंधातून त्याला […]