ताज्याघडामोडी

फॅबटेकटेक्नीकल कॅम्पस मध्ये “तांत्रिक शिक्षणातील प्रकल्प मार्गदर्शकांची भूमिका” या विषयावर कार्यशाळा संपन्न

सांगोला : फॅबटेक टेक्नीकल कॅम्पसकॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्चच्या संशोधन आणि विकास विभागाने “तांत्रिक शिक्षणातील प्रकल्प मार्गदर्शकांची भूमिका” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. याप्रसंगी संशोधन आणि विकास विभागाचे प्रमुख डॉ. सुभाष व्ही.जाधव यांनी प्राध्यापकांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांकडून दर्जेदार संशोधन कार्य कसे करून घ्यावे, विद्यार्थ्यांच्या प्रकल्प उपक्रमाचा उपयोग समाजासाठी फायदेशीर उत्पादने तयार करण्यासाठी कसा करायचा आणि विद्यार्थ्यांचे संशोधन कार्य कसे प्रकाशित करायचे याविषयी त्यांनी प्राध्यापकांना  मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस चे सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर व मॅनेजिंग डायरेक्टर डॉअमित रुपनरकार्यकारी संचालक मा.श्री दिनेश रुपनरकॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटेसंचालक डॉ.डी.एस.बाडकरडिग्री इंजिनिअरिंग प्राचार्य डॉ.रवींद्र शेंडगेपॉलिटेक्निक प्राचार्य डॉ.शरद पवार व प्रा.टी.एन.जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *