ताज्याघडामोडी

आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी एकास मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी आरोपी नामे दिपक संभाजी काळे रा. येड्राव ता. मंगळवेढा यास मुंबई उच्च न्यालयाचे न्यायमुर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी की,-
सदरील घटनेतील फिर्यादी नामे दिपक कुंडलिक ढावरे हा आहे.. फिर्यादी याचा भाऊ हनमंत ढावरे याचे एका महिलेशी संबंध असलेचा संशय होता. या संबंधातून त्याला संभाजी काळे, दिपक संभाजी काळे, अशिष संभाजी काळे व महादेव शिंदे यांनी गावातून घेवुन जावुन दोन वर्षापुर्वी मारहाण केली होती व त्या महिलेचा नाद सोडून दे म्हणून दमदाटी व शिवीगाळ केली होती. ते त्याला नेहमी दमदाटी व शिवीगाळ करून तुझे विरूध्द पोलीसात केस देतो म्हणून दमदाटी करीत होते. तसेच भाऊ हणमंत याने परत सदरील महिलेचे मोबाईलवर व्हॉटसअप चॅटींग केल्याने फिर्यादी यास संभाजी काळे यांनी येड्राव येथील घोडके वस्तीवर बोलावून घेवून चॅटींग दाखवून तुझ्या भावाला आम्ही या बद्दल चार पाच दिवसापूर्वी ताकीद दिलेली आहे तरी तु ऐकत नाही, तिचा नाद सोडत नाहीस, त्याला आम्ही सोडणार नाही तुला प्रकरण मिटवायचे असेल तर रुपये 50,000/- दे म्हणून दम दिला होता. त्याचे भितीपोटी त्यांना दि.6/04/2023 रोजी दुपारी 3.00 चे सुमारास विलास गायकवाड रा. मरवडे, ता. मंगळवेढा यांचे पान दुकानात 23,000/- रुपये संभाजी काळे यांना देणेसाठी ठेवले होते. ते पैसे संभाजी काळे व दिपक काळे यांनी त्याच दिवशी तेथुन घेवुन गेले होते. ते त्याला शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करीत असल्याने तो त्यांचे दबावाखाली होता. तसेच भाऊ हणमंत याचेवर 2017 साली खुनाचा गुन्हा दाखल असून सध्या तो जामीनावर सुटलेला आहे. त्या तक्रारीचे अनुशंगाने भारत आण्णाप्पा ढावरे, आण्णाप्पा भारत ढावरे, नागनाथ भारत ढावरे, मिलींद भिमराय ढावरे सर्व रा. खवे, ता. मंगळवेढा हे त्याला नेहमी तु केसमधून कसा जामीनावर सुटला, तुला बघतो तुझ्यावर आणखी एक खोटी केस टाकतो. म्हणून दमदाटी देत होते. त्याबद्दल मला भाऊ हणमंत याने सांगितले असता त्यांचेकडे तु लक्ष देवू नकोस असे सांगत होतो. भाऊ हणमंत हा वरील लोकांच्या त्रासामुळे मानसिक दबावाखाली होता त्याचे आत्महत्येस वरील लोकांना जबाबदार धरावे अशी डायरी लिहून त्याने आत्महत्या केलेली आहे. त्याने दिनांक 6.04.2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजणेपुर्वी त्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केलेली आहे.
सदर प्रकारामुळे आरोपी विरूध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 306,384, 323, 504, 506, 34 सह अन्वये सदर आरोपी यांच्या विरुध्द गु.र.नं. 293 / 2023 हा दि. 18/04/2023 रोजी दुपारी 12.23 मिनीटांनी मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला.सदर अर्जदार आरोपी नामे दिपक संभाजी काळे याने पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता परंतु सदरील अर्ज हा नामंजूर करणेत आला होता. त्यानंतर अर्जदार / आरोपी यांनी मुंबई उच्च न्यायालयात अ‍ॅड.संदिप कागदे याचेवतीने अटकपूर्व जामीनाचा अर्ज दाखल केला. अर्जदार यांचे वतीने युक्तीवाद करणेत आला. सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरून अर्जदार दिपक संभाजी काळे यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.सदर प्रकरणात अर्जदार दिपक संभाजी काळे यांचे वतीने अ‍ॅड. संदिप कागदे, अ‍ॅड. सुजय लवटे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *