शनिवारपासून देशासह राज्यात कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली. पण राज्यात दोन दिवसांसाठी लसीकरण अभियान स्थगित करण्यात आल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. १८ जानेवारीपर्यंत लसीकरण लस नोंदणीसाठीचे ‘को-विन’ अॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, हे वृत्त राज्याच्या आरोग्य विभागाने फेटाळून लावले आहे. कोरोनावरील दोन प्रतिबंधात्मक लसींच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर शनिवारपासून […]
ताज्याघडामोडी
ग्रामपंचात निवडणूक निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यास प्रतिबंध
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयानंतर विजयी मिरवणुका काढून आनंदोत्सव साजरा करण्याचे धाडस कराल तर सावधान. कारण, विजयोत्सव मिरवणुका काढण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल उद्या (दि.१८ जानेवारी) जाहीर केला जाणार आहे. यापार्श्वभूमीवर […]
क्रिकेटच्या मैदानातच हृदयविकाराच्या धक्क्याने तरुणाच्या मृत्यू
सांगलीच्या आटपाडीमध्ये क्रिकेट स्पर्धेदरम्यान खेळत असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने (Heart attack) एका तरुणाचा मृत्यू झाल्याची मन सुन्न करणारी घटना घडली आहे. अतुल विष्णू पाटील( वय 35) असं मयत तरुणांचे नाव आहे. मैदानात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने दरवर्षी क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात. यावर्षी त्या आटपाडी येथे सुरू होत्या. तासगाव […]
ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट; पोलिसाला १६ जणांकडून मारहाण
हिंगोली : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट लागलंय, वसमत तालुक्यातील गुंज गावात जिल्हा परिषद शाळेवर मतदान सुरू असताना एका पोलिसाला मारहाण झाली आहे. भाजपचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शिवहार नरवाडे आणि त्यांचे १५-१६ कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. पोलिस कर्मचारी गजानन पुरी यांनी त्यांना गर्दी टाळण्याच्या सूचना केल्या असता पुरी यांची कॉलर पकडून मारहाण झाली. […]
मंगळवेढा येथील बसवेश्वर स्मारकाचे काम तात्काळ मार्गी लावा
मंगळवेढा येथील श्री संत बसवेश्वर यांच्या स्मारकाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मंगळवेढा येथील श्री संत बसवेश्वर यांच्या स्मारकास मान्यता मिळालेली आहे. या कामासाठी यापूर्वीच्या शिवसेना-भाजप सरकारच्या कार्यकालावधीमध्ये निधीची तरतूद झालेली आहे असे समजते. तथापि जागेअभावी अद्यापर्यंत कामास […]
पंढरपूर युवा मुद्रक संस्थेतर्फे पत्रकार सुरक्षा समितीचे नुतन अध्यक्ष नुतन उपाध्यक्ष याचा सत्कार व मुद्रक संस्थेतर्फे तिळगुळ समारंभ
पंढरपूर युवा मुद्रक संस्थेतर्फे पत्रकार सुरक्षा समितीचे नुतन अध्यक्ष नुतन उपाध्यक्ष याचा सत्कार व मुद्रक संस्थेतर्फे तिळगुळ समारंभ पंढरपूर दि. 15 (प्रतिनिधी) – गेली नऊ वर्षे पंढरपूरात मुद्रकांसाठी कार्य करणारी एकमेव मुद्रक संस्था कार्यरत आहे. मुद्रक संस्थेने अल्पावधीतच मुद्रकांचे संघटन व मुद्रकांच्या अनेक प्रश्नांचे निराकरण करुन आपला नांवलौकिक मिळविला आहे. या संघटना बांधणीत संस्थेचे संस्थापक […]
दहावीचा अभ्यासक्रम निम्मा करावा या मागणीसाठी मुख्याध्यापक,शिक्षक संघटना आग्रही
कोरोना आणि लॉककडाऊन मुळे या वर्षी शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतर दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही त्यामुळे अभ्यासक्रम निम्म्याने कमी करावा अशी मागणी मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनांनी केली आहे.सध्या ऑनलाईन शिक्षण देण्यात येत असल्याने दहावीचा 25 टक्के अभ्यासक्रम यापूर्वीच कमी करण्यात आला होता. दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा मे – जून महिन्यात होणार असल्याचं शिक्षण मंत्र्यांनी जाहीर […]
अनुदानित ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन थेट बँकेमार्फत अदा होणार !
शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय वांद्रे येथे ग्रंथालय विभागाची आढावा बैठक उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे वेतन ऑफलाईन पद्धतीने होत असल्याने […]
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी दिलासा सीईटी सेल कडून दि.२० जानेवारी पर्यंत मुदतवाढ
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी दिलासा सीईटी सेल कडून दि.२० जानेवारी पर्यंत मुदतवाढ पंढरपूर– सध्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता अभियांत्रिकीसह अन्य प्रवेश प्रक्रिया सुरु असून केवळ कागदपत्राच्या विलंबामुळे विद्यार्थी व पालक यांची तारांबळ उडत असल्याने विद्यार्थी व पालकांनी कागदपत्रे पूर्ततेसाठी कालावधी वाढविण्याची मागणी केली होती. त्याला राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने हिरवा कंदील दाखवला असून आता ई. […]
पंढरपूरात कोविड लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
पंढरपूरात कोविड लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पंढरपूर, दि. 16:- कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी कोविशिल्ड लस निर्माण करण्यात आली असून, लसीकरणासाठी उपजिल्हा रुग्णालय येथील संसर्गजन्य रुग्णालय येथे लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन प्रांताधिकारी सचिन ढोले व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहिसलदार विवेक सांळुखे,, […]