ताज्याघडामोडी

पंढरपूर युवा मुद्रक संस्थेतर्फे पत्रकार सुरक्षा समितीचे नुतन अध्यक्ष नुतन उपाध्यक्ष याचा सत्कार व मुद्रक संस्थेतर्फे तिळगुळ समारंभ

पंढरपूर युवा मुद्रक संस्थेतर्फे पत्रकार सुरक्षा समितीचे नुतन अध्यक्ष नुतन उपाध्यक्ष याचा सत्कार
व मुद्रक संस्थेतर्फे तिळगुळ समारंभ

पंढरपूर दि. 15 (प्रतिनिधी) – गेली नऊ वर्षे पंढरपूरात मुद्रकांसाठी कार्य करणारी एकमेव मुद्रक संस्था कार्यरत आहे.  मुद्रक संस्थेने अल्पावधीतच मुद्रकांचे संघटन व मुद्रकांच्या अनेक प्रश्नांचे निराकरण करुन आपला  नांवलौकिक मिळविला आहे. या संघटना बांधणीत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. दत्ताजीराव पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. अशा या संघटनेमार्फत आज श्रीसंत दामाजी मठ येथे प्रतिवर्षाप्रमाणें प्रमाणें तिळगुळ समारंभ व  नुतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार समारंभ संघटनेचे अध्यक्ष श्री. दत्ताजीराव पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
प्रतिवर्षी संपन्न होणारा तिळगुळ समारंभ संस्थेचे ज्येष्ठ सदस्य व उपाध्यक्ष श्री. बबन सुरवसे यांचे शुभहस्ते संपन्न झाला. तिळाचे स्नेह व गुळाची गोडीनुसार सर्व मुद्रक बांधवांनी गोडीगुलाबी एकत्र राहून आपल्या व्यवसायाची प्रगती करावी असे गौरवोद्गार त्यांनी याप्रसंगी काढले.
यावेळी पंढरपूर सुरक्षा समितीचे नुतन अध्यक्ष श्री. यशवंत कुंभार यांचा सन्मान मुद्रक संस्थेचे अध्यक्ष श्री. दत्ताजीराव पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाला. तर पंढरपूर सुरक्षा समितीचे नुतन उपाध्यक्ष श्री. विजयकुमार कांबळे यांचा सन्मान मुद्रक संस्थेचे उपाध्यक्ष श्री. बबन सुरवसे यांचे शुभहस्ते संपन्न झाला. आपले मुद्रक बंधू श्री. गणेश बागडे यांची माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख पदी निवड झालेनिमित्त त्यांचा सत्कार श्री. रामकृष्ण बिडकर यांचे शुभहस्ते करण्यात आला. तसेच श्रीसंत दामाजी मठाचे व्यवस्थापक व वेळोवेळी संस्थेस सहकार्य करणारे श्री. आनंदराव जावळे यांचा सन्मान श्री. मंदार केसकर यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
मुद्रक संस्थेचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील बोलताना म्हणाले की संस्था एकट्या अध्यक्षावर नसते तुम्ही सर्व सदस्य माझ्यासोबत आहात व प्रत्येक वेळी मला प्रोत्हासन देता त्यामुळे मी अध्यक्ष आहे व संस्थेचे कार्य व्यवस्थित कार्य करत आहे. सर्व सदस्यानी मला प्रत्येक कार्यात पाठिंबा व विश्‍वास दिल्यामुळेच मी अध्यक्षपद अभिमानाने भुषिवत आहे.
सत्कार उत्तर देतांना पंढरपूर सुरक्षा समितीचे नुतन अध्यक्ष श्री. यशवंत कुंभार म्हणाले, गेली अनेक वर्षे मुद्रक संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमास मी स्वत: जातीने हजर राहिलो. संस्थेने आजपर्यंत घेतलेल्या कार्यक्रमात सुसुत्रता, नियोजन, व अध्यक्षाचे विचार सर्व मुद्रक संस्थेचे पदाधिकारी एकमताने मान्य करतात.
यावेळी मंदार केसकर यांनी संस्थेबद्दल गौरवउद्गार काढून संस्थेच्या कार्याची माहिती देऊन गेली नऊ वर्ष चालु असलेल्या कार्याची माहिती थोडक्यात विषद केली.ह्या समारंभाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री. मंदार केसकर यांनी केले. शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार (सोशल डिस्टंन्सिंगनुसार) हा समारंभ खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *