ताज्याघडामोडी

खरचं लसीकरणानंतर कोरोनाची लागण होते का? यावर केंद्र सरकारनेच दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात अक्षरशः थैमान घातलेले आहे. त्यातच कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणे अनेकांमध्ये जाणवू लागली आहे. दरम्यान या कोरोनाविरोधातील लढाईत आता लसीकरण मोहिमेने वेग धरला आहे. आत्तापर्यंत देशातील १३ कोटीहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. परंतु या लसीकरणानंतरही काहींना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे खरच लसीकरणानंतर कोरोनाची […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

‘तुला चपलेनं मारलं नाही, तर माझं नाव रणजित नाही’

वर्धा | राज्यात कोरोनाच्या संकटामुळे चिंताजनकपरिस्थिती निर्माण झाली आहे. डॉक्टरांसह वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, संपूर्ण आरोग्य यंत्रणा रोज नव्या समस्यांना सामोरे जात आहे. अशातही आरोग्य विभागातील लोकांना नातेवाईकांकडूनही हल्ले आणि असभ्य वागणूक दिल्याच्या घटना समोर येत आहे. मात्र, वर्ध्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी थेट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना […]

ताज्याघडामोडी

रुग्णालयाला कोरोनाने ग्रासलं; 80 जणांना संसर्ग, 27 वर्षे सेवा देणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरचा मृत्यू

नवी दिल्ली, 10 मे : कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि बाकी मेडिकल स्‍टॉफला संसर्ग होण्याच्या आणि अनेकांचा जीव गेल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. देशातील अनेक भागातून फ्रंट लाइन वर्कर्सच्या मृत्यूची बातमी येत असते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तर ही स्थिती अधिक बिघडली आहे. अनेक रुग्णालयात तर स्टाफचे अनेक सदस्य एकत्रितपणे पॉझिटिव्ह आले […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ; माजी आमदारासह चौघांवर गुन्हा दाखल

पुणे, 10 मे: विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी पुण्यातील माजी आमदार बाळासाहेब उर्फ चंद्रकांत शिवरकर आणि त्यांचा मुलगा माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांच्यासह चौघांविरुद्ध कौटुंबीक हिंसाचाराप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शिवरकर यांची सून 37 वर्षीय स्नेहा अभिजित शिवरकर यांनी वानवडी पोलिसांत फिर्याद दिली असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी 38 […]

ताज्याघडामोडी

आठ ते दहा दिवसांत स्पुटनिक व्ही लस बाजारात विक्रीला

रशियन कोरोना लस वापरण्यासाठी आपत्कालीन मंजुरी मिळाल्यानंतर डॉ. रेड्डीज लॅबने रशियाची स्पुटनिक-व्ही लस आयात केली आहे. लसीचे दीड लाख डोस हिंदुस्थानात पोहोचले आहेत. मात्र अजूनही लस बाजारात यायला आठ ते दहा दिवस लागतील. तिच्या एका डोसची हिंदुस्थानातील किंमत 300 ते 600 रुपयांदरम्यान असू शकते. स्पुटनिक-व्हीचे नमुने तपासणीसाठी हिमाचल प्रदेशातील कसौली येथील केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात […]

ताज्याघडामोडी

कोरोना रूग्णाचा मृतदेह प्लॅस्टिकमधून काढून लोकांनी केला ‘दफन’

राजस्थानच्या सीकर जिल्ह्याच्या एका गावात एका कोविड पीडित व्यक्तीचा मृतदेह कथित प्रकारे दफन केल्यानंतर सुमारे 21 लोकांनी आपला जीव गमावला, या व्यक्तीचा मृतदेह कोणत्याही कोविड प्रोटोकॉलचे पालन न करता गुजरातहून आणला गेला होता. राजस्थान काँग्रेस प्रमुख आणि राज्याचे शिक्षण मंत्री गोविंद सिंह डोटासरा यांच्या विधानसभा मतदार संघातील सीकरच्या खीरवा गावात ही घटना घडली आहे. अधिकार्‍यांनी […]

ताज्याघडामोडी

कोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO चेअरमनची घोषणा

सध्या कोरोनाबाधित रुग्णांची ऑक्सिजन लेवल झपाट्याने कमी होत असल्याची मोठी समस्या समोर येत आहे. यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. आता ‘2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज’ या अँटी-कोविड औषधाला आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. डीआरडीओच्या अँटी-कोविड औषध ‘2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज’ला अलीकडेच आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी म्हणाले आहेत की, 11 किंवा 12 मेपासून ही […]

ताज्याघडामोडी

सर्वच व्यावसायिकांनाही घरपोच सेवेसाठी परवानगी द्यावी

जीवनावश्यक वस्तुंची सेवा पुरवणाऱ्या व्यावसायिकांप्रमाणे इतर सर्व व्यावसायिकांनादेखील घरपोच सेवा पुरवण्यास परवानगी देण्यात यावी. याबरोबरच व्यापाऱ्यांचा संपर्क थेट ग्राहकांबरोबर होत असल्याने त्यांचे लसीकरण करण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे महापौर मुरलीधर मोहोळ आणि पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे करण्यात आली आहे. पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी ही […]

ताज्याघडामोडी

रिक्षा चालकांच्या खात्यावर १५०० रुपये वर्ग करण्यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध

कोविड काळातील मदत म्हणून राज्य सरकारने राज्यातील रिक्षा चालकांना प्रत्येकी पंधराशे रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने 108 कोटी रुपयांच्या खर्चाला अनुमती दिली आहे.राज्यातील सुमारे 7 लाख 20 हजार रिक्षा चालकांना या योजनेचा लाभ होणार आहे. लॉकडाऊन मुळे रिक्षा व्यवसाय बंद झाल्याने या रिक्षा चालकांना तातडीची आर्थिक मदत […]

ताज्याघडामोडी

मोदींनी तीन महिन्यात साडेसहा कोटी लसी परदेशात पाठवल्या

गेल्या ३ महिन्यांमध्ये केंद्र सरकारने जगातील ९३ देशांना साडेसहा कोटी लसींचा पुरवठा केला. पहिली लाट ओसरल्यानंतर हा भारतातील करोना महासाथीचा शेवट असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे भाकीत फोल ठरले आहे तर देशातील माध्यमांची,न्यायालयाची दखल मोदींनी घेतली नाही निदान परदेशातील माध्यमातून होणारी टीका तरी लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात असे मत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी व्यक्त केले आहे.  […]