ताज्याघडामोडी

कोरोना रुग्णांसाठी हे प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO चेअरमनची घोषणा

सध्या कोरोनाबाधित रुग्णांची ऑक्सिजन लेवल झपाट्याने कमी होत असल्याची मोठी समस्या समोर येत आहे. यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. आता ‘2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज’ या अँटी-कोविड औषधाला आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने मंजुरी दिली आहे.

डीआरडीओच्या अँटी-कोविड औषध ‘2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज’ला अलीकडेच आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी म्हणाले आहेत की, 11 किंवा 12 मेपासून ही कोविड औषध बाजारात उपलब्ध होऊ शकेल. त्यांनी सांगितले की सुरुवातीला किमान 10 हजार औषधाचे डोस बाजारात येऊ शकतात. इंडिया टीव्हीच्या एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली आहे.

डीआरडीओने विकसित केलेले हे औषध गोळी, सिरप, इंजेक्शन आणि पावडर स्वरुपात पाकिटामध्ये मिळणार आहे, जे औषध पाण्यात विरघळवून पिता येतं. हे विषाणू, संक्रमित पेशींमध्ये जमा होऊन व्हायरल संश्लेषण आणि उर्जा उत्पादन थांबवून विषाणू वाढीस प्रतिबंधित करते, असं देखील सतीश रेड्डी यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *