ताज्याघडामोडी

रिक्षा चालकांच्या खात्यावर १५०० रुपये वर्ग करण्यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध

कोविड काळातील मदत म्हणून राज्य सरकारने राज्यातील रिक्षा चालकांना प्रत्येकी पंधराशे रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने 108 कोटी रुपयांच्या खर्चाला अनुमती दिली आहे.राज्यातील सुमारे 7 लाख 20 हजार रिक्षा चालकांना या योजनेचा लाभ होणार आहे. लॉकडाऊन मुळे रिक्षा व्यवसाय बंद झाल्याने या रिक्षा चालकांना तातडीची आर्थिक मदत म्हणून ही मदत दिली जाणार आहे. आता लवकरच सर्व रिक्षा चालकांच्या खात्यात ही प्रत्येकी पंधराशे रुपयांची मदत पोहचती होणार आहे.त्यासाठी रिक्षा चालकांना त्यांचे परमीट, बॅजेस, गाडीची कागदपत्रे तसेच आधार कार्ड या तपशीलासह नोंदणी करावी लागणार आहे. परवानाधारक अधिकृत रिक्षा चालकांनाच ही मदत दिली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *