ताज्याघडामोडी

मोदींनी तीन महिन्यात साडेसहा कोटी लसी परदेशात पाठवल्या

गेल्या ३ महिन्यांमध्ये केंद्र सरकारने जगातील ९३ देशांना साडेसहा कोटी लसींचा पुरवठा केला. पहिली लाट ओसरल्यानंतर हा भारतातील करोना महासाथीचा शेवट असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे भाकीत फोल ठरले आहे तर देशातील माध्यमांची,न्यायालयाची दखल मोदींनी घेतली नाही निदान परदेशातील माध्यमातून होणारी टीका तरी लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात असे मत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी व्यक्त केले आहे.   

‘केंद्र सरकारमधील काही लोक याबाबत म्हणतील की, आपण आंतरराष्ट्रीय करारांना बांधील असल्याने हे करावं लागलं. मात्र अमेरिका, फ्रांस, युरोपियन युनियन यांसारखे देशही आंतरराष्ट्रीय करारांशी बांधील आहेत. मात्र त्यांनी इतर देशांना प्राथमिकता न देता त्यांच्या देशवासियांचे लसीकरण केले. केवळ आपणच आपल्या नागरिकांना मारण्यासाठी सोडून इतरांना लसी वाटत बसलो’ अशी घणाघाती टीका सिसोदिया यांनी केली.मोदी सरकारची प्रतिमा उंचावण्यासाठी व इतर देशांकडून प्रशंसा करून घेण्यासाठी होते काय? असा सवालही सिसोदिया यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *