जालना : नवविवाहित महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना जालन्यात उघडकीस आली आहे. 24 वर्षीय डॉक्टर प्रांजल कोल्हे हिचा नुकताच विवाह झाला होता. वडिलांच्या नावाने सुसाईड नोट लिहित प्रांजलने आयुष्य संपवलं. मात्र तिच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. 24 वर्षीय महिला डॉक्टर प्रांजल कोल्हे हिने आत्महत्या केली. डॉ. प्रांजल […]
ताज्याघडामोडी
लॉकडाऊन वाढणार की हटवणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साधणार संवाद
मुंबई, 30 मे : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे 1 जूननंतर लॉकडाऊन वाढवणार की निर्बंध आणखी शिथील केले जाणार याबद्दल चर्चा सुरू आहे. अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. आज रात्री 8.30 वाजता मुख्यमंत्री ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहे. राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लावण्यात […]
RBI कडून लवकरच 100 रुपयांची नवीन नोट जारी
नवी दिल्ली : रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI)100रुपयांची नवीन नोट आणणार आहे. याची विशिष्ट बाब म्हणजे नोट चमकदार असणार आहे. ही नोट टिकाऊ असेल. मोठ्या प्रमाणात ही नोट भारतीय चलनात आणण्यात येणार आहे. ही नवीन नोट वार्निश पेंट केल्याने फाटणार नाही,पाण्यात भिजणार देखील नाही.या मुळे ही नोट जपून ठेवण्याची गरज देखील नाही.रिझर्व बँकेला दरवर्षी लाखो […]
सातबाऱ्यावर नोंदीसाठी १० हजाराची लाच, वरून दारू मटणाच्या पार्टीची मागणी
गलेगठ्ठ पगार असूनही लाचखोरीच्या महाराष्ट्रातील महसूल विभागाचे कर्मचारी सर्वाधिक आघाडीवर असतात हे राज्याच्या लाचलुचपत गेल्या अनेक वर्षात केलेल्या कारवायातुन स्पष्ट झाले आहे.शेतजमीन,प्लॉट,फ्लॅट आदींच्या खरेदी -विक्रीचे व्यवहार नोंदवल्यानंतर,वाटणीपत्र झाल्यानंतर सर्वाधिक अडवणूक होते ती फेरफार नोंदीची.या नोंदीच्या प्रक्रियेत सामान्य जनतेला मात्र नाहक त्रास सहन करावा लागतो,लाचेची मागणी केली जात असल्याचे शेकडो प्रकार वर्षाकाठी उघडकीस येतात.असाच प्रकार बुलढाणा […]
तर अंगावर वर्दी ठेवणार नाही, पोलिसांना धमकी देत शिवीगाळ, धक्कादायक प्रकार
औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात राहावी म्हणून अनेक संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक नियम लागू आहेत. मात्र, अनेक ठिकाणी नागरिकांकडून नियम पायदळी तुडवले जातायत. एवढेच नाही तर नियम मोडल्यामुळे जाब विचारल्यानंतर अनेकजण पोलिसांशी हुज्जतसुद्धा घालत आहेत. त्याची प्रचिती औरंगाबादेत आली आहे. मास्क न घातल्यामुळे पोलिसांनी अडवल्यामुळे त्यांच्याशी धक्काबुक्की करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन तरुण आणि […]
ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय कायद्याला धरून नाही: प्रकाश आंबेडकर
पुणे: सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण रद्द केलं होतं. या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेली याचिकाही कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द करण्याचा केंद्राचा निर्णय कायद्याला धरून नाही, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी […]
व्हायरल बातमी खरी की खोटी? चुकीच्या माहिती प्रसाराला आळा बसण्यासाठी Facebook चं मोठं पाऊल
याच पार्श्वभूमीवर, चुकीची माहिती पसरवली जाऊ नये म्हणून आता अखेर सोशल मीडियाकडून काही पावलं उचलली गेली आहेत. चुकीची माहिती असलेली ट्विट्स फ्लॅग करण्याची सुविधा अलीकडेच ट्विटरने दिली होती. आता फेसबुकनेही माहितीची सत्यता दर्शवण्यासाठी एक उपक्रम हाती घेतला आहे. कोविड-19 आणि त्यावरील लशी, हवामानबदल, निवडणुका आणि अन्य अनेक विषयांबद्दल चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती फेसबुकवर शेअर […]
SBI कडून पैसे काढण्याच्या नियमांत बदल, आता ‘एवढेच’ पैसे काढता येणार
नवी दिल्लीः कोरोनाच्या संकटात ग्राहकांना दिलासा देण्यासाठी देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI-State Bank of India) एक मोठे पाऊल उचलले. बँकेने एका दिवसात खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा वाढविली. नवीन नियमांनुसार आपण आपल्या शेजारच्या शाखेत (होम ब्रांच वगळता) जाऊन पैसे काढण्याचा फॉर्म भरून दिवसाला 25000 रुपये काढू शकता. बँक खात्यातून पैसे […]
अबब ! 500-2000 च्या नोटांचा खच, कुख्यात गुंडाच्या घरात दोन नंबरचा पैसा? व्हिडीओ व्हायरल
मुंबई : सर्वसामान्य माणूस आयुष्यभर मेहनत करुन थोडीफार रक्कम आपल्या मुलाबाळांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी शिल्लक ठेवू शकतो. पण नोटांचे बंडल किंवा घबाड घरात साठवू शकत नाही. त्यामुळे एखाद्याच्या घरात नोटांचं घबाड आढळलं तर ती सर्वसामान्य गोष्ट अजिबात नाही. त्यामुळेच मुंबईचा एक कुख्यात गुंडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या गुंडाचं नाव शम्स अली सय्यद उर्फ जॉनी असं आहे. […]
दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत 60 टक्के अधिक रुग्णवाढीचे IIT दिल्लीचे संकेत
नवी दिल्ली : आपल्या एका रिपोर्टमध्ये आयआयटी दिल्लीने कोरोनाच्या सर्वात वाईट काळाचा सामना करण्याची तयारी ठेवा. तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या दररोज 45 हजाराच्या वर जाण्याची शक्यता आहे. त्यातील दररोज 9 हजाराहून अधिक रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याची गरज असेल, असे म्हटले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतचा हा रिपोर्ट दिल्ली उच्च न्यायालयात जमा करण्यात आला आहे. कोरोनाच्या […]