ताज्याघडामोडी

SBI कडून पैसे काढण्याच्या नियमांत बदल, आता ‘एवढेच’ पैसे काढता येणार

नवी दिल्लीः कोरोनाच्या संकटात ग्राहकांना दिलासा देण्यासाठी देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI-State Bank of India) एक मोठे पाऊल उचलले. बँकेने एका दिवसात खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा वाढविली. नवीन नियमांनुसार आपण आपल्या शेजारच्या शाखेत (होम ब्रांच वगळता) जाऊन पैसे काढण्याचा फॉर्म भरून दिवसाला 25000 रुपये काढू शकता. बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी एक फॉर्म दिला जातो, ज्याला पैसे काढण्याचा फॉर्म म्हणतात. हा फॉर्म केवळ बँकेच्या शाखेत उपलब्ध आहे.

SBI मधून रोख रक्कम काढण्यासाठी नवीन नियम

(1) बँकेने जाहीर केलेल्या माहितीत असे सांगितले गेले आहे की, पैसे काढण्याच्या फॉर्मद्वारे दुसर्‍या शाखेत जाऊन ग्राहक त्यांच्या बचत खात्यातून 25 हजार रुपये काढू शकतात.

(2) आता धनादेशाद्वारे दुसर्‍या शाखेतून 1 लाख रुपयांपर्यंत पैसे काढता येतात.

(3) थर्ड पार्टी (ज्याला धनादेश देण्यात आला), रोख पैसे काढण्याची मर्यादा 50 हजार रुपये करण्यात आली.

नवीन नियमांमधील बदल कधी आणि किती काळ लागू राहतील

एसबीआयने तातडीने प्रभावीपणे नवीन नियम लागू केलेत. हे नियम 30 सप्टेंबर 2021 पर्यंत लागू राहतील.

नवीन नियमांसाठी अटी लागू

रोकड काढून घेण्याच्या नव्या नियमांबरोबरच बँकेनेही अटी लागू केल्यात. बँकेने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आलेय. थर्ड पार्टी विड्रॉल फॉर्मद्वारे रोख रक्कम काढू शकत नाही. याशिवाय थर्ड पार्टी केवायसी कागदपत्रही आवश्यक आहे.

एसबीआयने नियमात सहजता का आणली?

बँकिंग तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी बँकेने शाखांमध्ये अनेक बदल केलेत. आता फक्त बँक फक्त सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत हे उघडते. तसेच बँक आपल्या कर्मचार्‍यांच्या 50 टक्के सदस्यांसमवेत कार्यरत आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. म्हणूनच एसबीआयने आपल्या ग्राहकांच्या सुविधा वाढविण्यासाठी रोख पैसे काढण्याचे नियम बदललेत, जेणेकरून कमी वेळात अधिक काम करता येईल.

एटीएममधून पैसे काढण्याचे नवीन नियम

एसबीआय आपल्या नियमित बचत खातेधारकांना एका महिन्यात 8 विनामूल्य व्यवहार करण्याची परवानगी देते. यात 5 एसबीआय एटीएम आणि अन्य 3 बँक एटीएमच्या व्यवहारांचा समावेश आहे. मेट्रो नसलेल्या शहरांमध्ये 10 विनामूल्य एटीएम व्यवहार उपलब्ध आहेत, ज्यात एसबीआयमार्फत 5 व्यवहार करता येतात, तर अन्य 5 इतर बँकांच्या एटीएममधून करण्याची परवानगी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *