गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

24 वर्षीय नवविवाहित डॉक्टरची आत्महत्या, वडिलांच्या नावे सुसाईड नोट

जालना : नवविवाहित महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना जालन्यात उघडकीस आली आहे. 24 वर्षीय डॉक्टर प्रांजल कोल्हे हिचा नुकताच विवाह झाला होता. वडिलांच्या नावाने सुसाईड नोट लिहित प्रांजलने आयुष्य संपवलं. मात्र तिच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. 24 वर्षीय महिला डॉक्टर प्रांजल कोल्हे हिने आत्महत्या केली. डॉ. प्रांजल कोल्हे हिचा अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता.

‘पप्पा मला माफ करा’ अशी चिठ्ठी आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टर प्रांजल कोल्हे हिने वडिलांच्या नावे लिहिली होती. माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरु नये, असेही डॉक्टर प्रांजलने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. आता या प्रकरणाचा तपास भोकरदन पोलीस करत आहेत.

लखनौमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या

दुसरीकडे, इमारतीच्या 18 व्या मजल्यावरुन उडी घेत महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला घडली होती. 34 वर्षीय डॉ. विनिता राय गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होती, अशी माहिती तिच्या पतीने दिली होती.

डॉ. विनिता राय आयुर्वेदाच्या डॉक्टर

नोएडातील सेक्टर 77 मध्ये प्रतीक विस्टीरिया हाऊसिंग सोसायटीमध्ये डॉ. विनिता राय पतीसह राहत होती. बिल्डिंगच्या 18 व्या मजल्यावरील घरातून तिने उडी घेतली, यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. डॉ. विनिता यांनी उचललेल्या धक्कादायक पावलामुळे कुटुंबीयही हैराण होते. डॉ. विनिता राय आयुर्वेदाच्या डॉक्टर होत्या. नोएडातील पिलखुआ भागात एका रुग्णालयात त्या कार्यरत होत्या.

व्हिडीओ रेकॉर्ड करत विवाहितेची आत्महत्या

दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार दहा दिवसांपूर्वी घडला होता. झारखंडमधील धनबाद शहरात कोमल पटेल हिने आयुष्य संपवलं होतं. “बाबा, मी सुसाईड करत आहे. पुन्हा सासरी येऊन खूप मोठी चूक केली. सॉरी पापा, मी तुमचं म्हणणं ऐकलं नाही. मला वाटलं माझा नवरा सुधारला असेल. पण त्याने पुन्हा मला मारहाण करण्यास सुरुवात केली. बाबा, माझ्या मुलाची काळजी घ्या, एवढंच तुम्हाला सांगायचं आहे” असं कोमल व्हिडीओमध्ये रडत रडत म्हणाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *