ताज्याघडामोडी

दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत 60 टक्के अधिक रुग्णवाढीचे IIT दिल्लीचे संकेत

नवी दिल्ली : आपल्या एका रिपोर्टमध्ये आयआयटी दिल्लीने कोरोनाच्या सर्वात वाईट काळाचा सामना करण्याची तयारी ठेवा. तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या दररोज 45 हजाराच्या वर जाण्याची शक्यता आहे. त्यातील दररोज 9 हजाराहून अधिक रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याची गरज असेल, असे म्हटले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतचा हा रिपोर्ट दिल्ली उच्च न्यायालयात जमा करण्यात आला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दररोज 944 मॅट्रीक टन ऑक्सीजनची आवश्यकता भासणार आहे. यावर न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे की, सरकारने या रिपोर्टच्या अनुसार आवश्यक ती पावले उचलावी. आपण शतकातून एकदा येणाऱ्या महामारीशी मुकाबला करीत आहोत.

शेवटची महामारी 1920 मध्ये आली होती. येणाऱ्या कोरोना लाटेचा मुकाबला करण्यासाठी ऑक्सिजनची निर्मिती प्राध्यान्याने वाढवणे गरजेचे असणार आहे.

आयआयटी दिल्लीच्या रिपोर्टमध्ये 3 परिस्थितींबाबत उल्लेख केला आहे. त्यानुसार सरकारी आरोग्य सुविधा वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर रुग्णांची संख्या, ऑक्सिजनच्या गरजेचे अनुमान तसेच नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येच्या प्रमाणात सुविधा वाढवण्याचे आव्हान आपल्यासमोर असणार आहे. त्यातच या तिसऱ्या लाटेमुळे रुग्णांच्या संख्येत 60 टक्के अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *