गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सातबाऱ्यावर नोंदीसाठी १० हजाराची लाच, वरून दारू मटणाच्या पार्टीची मागणी

गलेगठ्ठ पगार असूनही लाचखोरीच्या महाराष्ट्रातील महसूल विभागाचे कर्मचारी सर्वाधिक आघाडीवर असतात हे राज्याच्या लाचलुचपत गेल्या अनेक वर्षात केलेल्या कारवायातुन स्पष्ट झाले आहे.शेतजमीन,प्लॉट,फ्लॅट आदींच्या खरेदी -विक्रीचे व्यवहार नोंदवल्यानंतर,वाटणीपत्र झाल्यानंतर सर्वाधिक अडवणूक होते ती फेरफार नोंदीची.या नोंदीच्या प्रक्रियेत सामान्य जनतेला मात्र नाहक त्रास सहन करावा लागतो,लाचेची मागणी केली जात असल्याचे शेकडो प्रकार वर्षाकाठी उघडकीस येतात.असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील पिंपरी घनगर येथे घडला असून नोंदीसाठी दहा हजाराची लाच स्वीकारून वरून दारू व मटणाच्या पार्टीवर ताव मारत असलेल्या मंडलअधिकारी आणि तलाठी यांना लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे.

संबंधित मंडल अधिकारी आणि तलाठ्याने फ्लॅटची सातबारा उताऱ्यावर नोंदणी करून फेरफार नक्कल देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेतली आहे. त्याचबरोबर संबंधित व्यक्तीला चक्क दारू आणि मटणाची पार्टी देण्यास सांगितलं. या घटनेची गुप्त माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळाल्यानंतर त्यानी सापळा रचून दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडलं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सायंकाळी बुलडाणा  जिल्ह्यातील पिंप्री घनगर शिवारातील प्रल्हाद चव्हाण यांच्या शेतात ही कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *