ताज्याघडामोडी

हा टॅटू कोणाचा? नव्या नवरीला प्रश्न केला, पतीचा जीव गेला; निष्प्राण देह दोन दिवस पेटत होता

मध्य प्रदेशच्या भिंडमध्ये विवाहबाह्य संबंधातून धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रियकरानं त्याच्या प्रेयसीच्या पतीची हत्या केली. यानंतर चंबळच्या बिहडमध्ये दोन दिवस त्याचा मृतदेह जाळला. भिंडच्या गोहद चौक परिसरात ही घटना घडली. गोरमी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मोनू सिंहचा विवाह सहा महिन्यांपूर्वी भिंडच्या रेखा तोमरशी झाला. लग्नानंतर रेखा सासरी आली. तिच्या हातावर प्रियकराच्या नावाच्या आद्याक्षराचा टॅटू […]

ताज्याघडामोडी

‘त्या’ संध्याकाळी काय घडलं? रक्ताळलेल्या कपड्यांसह ‘तो’ घाईघाईने बाहेर पडला, वॉचमन समोर येताच म्हणाला…

जोगेश्वरी परिसरातील एका सोसायटीमध्ये मंगळवारी एका केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने वृद्ध दाम्पत्यावर हल्ला केल्याची घटना घडली होती. जोगेश्वरीच्या मेघेवाडी परिसरातील श्री समर्थ सोसायटीमध्ये सुधीर कृष्णकुमार चिपळुणकर (वय ७२) आणि सुप्रिया सुधीर चिपळुणकर (वय ६५) यांच्या घरी हा प्रकार घडला होता. साधारण १५ दिवसांपूर्वी पप्पू गवळी याला सुधीर चिपळुणकर यांच्या सुश्रूषेसाठी कामाला […]

ताज्याघडामोडी

भावा, तू सैनिक हो! मी वरुन बघेन!! अग्नीवीर भरतीत अपयश; तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

एका १९ वर्षीय तरुणानं आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे. मूळचा अलिगढचा रहिवासी असलेला तरुण नोएडात राहून लष्कर भरतीची तयारी करत होता. अग्नीवीर म्हणून लष्करात भरती होऊन देशसेवा करण्याचं त्याचं स्वप्न होतं. मात्र त्यात त्याला अपयश आलं. यामुळे त्यानं टोकाचा निर्णय घेतला आणि आयुष्याला पूर्णविराम दिला. गळफास लावून त्यानं जीवन प्रवास थांबवला. अग्नीवीर भरती प्रक्रियेत अपयश […]

ताज्याघडामोडी

इन्स्टाग्रामवरुन मैत्री जुळली, शाळकरी मुलानं गैरफायदा घेतला, अल्पवयीन मुलीसोबत जे घडलं ते धक्कादायक

धावपळीच्या जगात सोशल मीडियाने इतका धुमाकूळ घालून ठेवला आहे की इकडे तिकडे बघण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही. इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, फेसबुक हे लहानांपासून थोरांपर्यंत व्यक्त होण्याचे माध्यम झाले आहे. त्याचा वापर शाळकरी मुलांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचा दुष्परिणाम इतका घातक होत आहे, की याचे सामाजिक भानच राहत नाही. लॉकडाऊननंतर अभ्यासासाठी मुलांच्या हातात आलेला मोबाईल हाच […]

ताज्याघडामोडी

पेट्रोल भरुन परतत होते, तेवढ्यात अनर्थ घडला, डॉक्टर दाम्पत्याचा संसार क्षणात उद्ध्वस्त

पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर येथे कारला ट्रकची जोरात धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर, त्यांचे डॉक्टर पती हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत ट्रक चालकावर शिक्रापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. सोनाली मच्छिंद्र खैरे (वय ३७) असे मृत झालेल्या डॉक्टरचे नाव असून त्यांचे […]

ताज्याघडामोडी

छातीत जळजळ, पोटात दुखणं सहन झालं नाही; रुग्णाने रुग्णालयातच घेतला गळफास

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात असलेल्या जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाने बुधवारी १५ फेब्रुवारी रोजी दुपारी उपचार सुरू असताना रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. छातीत जळजळ होणे, पोटात दुखणे या आजारावर उपचार सुरू होते. सोमनाथ बिभीषण पिसाळ(वय ३२ रा, बार्शी, जि. सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस […]

ताज्याघडामोडी

दीर वहिणीकडे रोज करायचा भलतीच मागणी, तिने काटा काढला, गावकऱ्यांनी वहिनीला घातला चपलांचा हार

तेलंगणातील महबूबाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेला चपलांची माळ घालून संपूर्ण परिसरात तिची धिंड काढण्यात आली. याचे कारण ऐकून अनेकांना धक्का बसला. या महिलेने दोन लोकांच्या मदतीने आपल्या दिराची हत्या केली होती.  आपणच दिराची हत्या केल्याची जाहीर कबुली या महिलेने दिली आहे. माझ्या पतीच्या मृत्यूनंतर माझा दीर माझ्याशी शरीरसंबंध ठेवण्याची गळ […]

ताज्याघडामोडी

घराबाहेर फेरी मारली, दार उघडताच चिठ्ठी देत डाव साधला,राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांवर जीवघेणा हल्ला

येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोराने चाकूने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनीषा पाटील यांनी प्रसंगावधान राखून हातावर वार झेलल्यामुळे त्या बचावल्या असून हाताला गंभीर जखम झाली आहे. सध्या पाटील यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बचतगटाच्या टेंडर प्रक्रियेतील अनियमिततेविरोधात केलेल्या तक्रारींमुळे जिल्हा परिषदेच्या महिला व […]

ताज्याघडामोडी

मनसेचं अखेर ठरलं..! कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा, मात्र..

पुण्यातील चिंचवड आणि कसबा पेठ मतदारसंघासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी मनसेने आपली भूमिका जाहीर केली आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राजकारण तापलं असताना मनसेने तटस्थ भूमिका स्वीकारली होती. मात्र आता मनसेने आपले पत्ते खोलले असून दोन्ही ठिकाणी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे . मनसे भाजपला पाठिंबा देणारआहे मात्र प्रचारात सहभागी होणार नाही, असं मनसे नेते बाबू […]

ताज्याघडामोडी

डाळींबाच्या बागेत पिकवला कोटींचा गांजा; पोलिसांनी शेतकऱ्यास घेतले ताब्यात

डाळिंबाच्या शेतामध्ये गांजाच्या झाडांची विक्री करण्यासाठी लागवड आणि जोपासणा करणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी पोलिसांनी १ कोटी ५ लाख ७५ हजार ५०० रुपयांची गांजाची झाडे जप्त केली आहेत. अंमली पदार्थांबाबत सातारा जिल्ह्यातील आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. ही कारवाई सातारा स्थानिक गुन्हे शाखेने केली. संशयित आरोपी कुंडलिक निवृत्ती […]