स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम
कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट व खेड (ता. उत्तर सोलापूर ) मधील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या वतीने माढा, बार्शी व करमाळा या तीन तालुक्यांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन रविवारी (दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ०१:३० वाजता) कुर्डुवाडीतील ‘तुळजाई लॉन्स अँड लॉजिंग’ बार्शी नाका, करमाळा रोड याठिकाणी आयोजित केल्याची माहिती स्वेरी, पंढरपूर व एस.व्ही.आय.टी. सोलापूरच्या संयोजन समितीने दिली.
या ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार वितरण’ सोहळ्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्याविकास मंडळ करमाळ्याचे सचिव विलास घुमरे हे असणार आहेत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बार्शीतील झाडबुके शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. वर्षाताई ठोंबरे, श्री. भैरवनाथ प्रतिष्ठान करमाळ्याचे संस्थापक अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य प्रा. जयप्रकाश बिले, शिवाजी शिक्षण मंडळ बार्शीचे खजिनदार जयकुमार शितोळे, कुर्डुवाडीच्या श्री तुळजाभवानी बहुउद्देशीय सहकारी संस्थेचे संस्थापक डॉ. एम. पी. सुरवसे, जगदंबा ग्रुप सर्जापूरचे अध्यक्ष डॉ. कपिल कोरके, यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे अध्यक्ष अरुण बारबोले, कुर्डूवाडीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र दास, कै. विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णीचे प्राचार्य डॉ. महेंद्र कदम, कुर्डुवाडीतील आदिशक्ती शिक्षण संस्था वेताळवाडी संचलित आदर्श पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष अमोल सुरवसे, विद्यामंदिर संस्था वैरागचे अध्यक्ष भूषण भूमकर, सुयश विद्यालय बार्शीचे संस्थापक शिवदास नलावडे, जय जगदंबा बहुउद्देशिय संस्थेचे अरुण कापसे, अर्णव शिक्षण संकुल वैरागचे सचिव रविंद्र कापसे, नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ माळेगावचे संचालक विलास मिरगणे, बालाजी बहुउद्देशीय संस्था चिकलठाणचे डॉ. ब्रिजेश बारकुंड, गुरुकुल विद्यालय पांडेचे अध्यक्ष नितीन भोगे, भारत शिक्षण प्रसारक मंडळ जेऊरचे सचिव अर्जुनराव सरक, संस्थाचालक संघटना सोलापूरचे सचिव बापू निळ, शेळगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबारावजी गायकवाड, तुळजाभवानी महिला मंडळाचे अध्यक्ष निलेश गायकवाड, बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नितीन कवठाळे यांच्यासह तिन्ही तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षकवृंद उपस्थित राहणार आहेत. स्वेरीचे संस्थापक व स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष डॉ बी.पी. रोंगे हे समन्वयक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. तरी यासाठी तिन्ही तालुक्यातील शिक्षण क्षेत्राशी संबंधित असणार्या सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीने केलेले आहे.






