ताज्याघडामोडी

छातीत जळजळ, पोटात दुखणं सहन झालं नाही; रुग्णाने रुग्णालयातच घेतला गळफास

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात असलेल्या जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाने बुधवारी १५ फेब्रुवारी रोजी दुपारी उपचार सुरू असताना रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. छातीत जळजळ होणे, पोटात दुखणे या आजारावर उपचार सुरू होते. सोमनाथ बिभीषण पिसाळ(वय ३२ रा, बार्शी, जि. सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ यांना दोन मुलं आहेत. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी रुग्णालया बाहेर त्याच्या पत्नीने आणि मुलांनी हंबरडा फोडला. सोमनाथ पिसाळ या तरुणावर बार्शीमधील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दोन दिवसांपासून उपचार सुरू होते. छातीत जळजळ होणे, पोटात दुखणे या आजाराने सोमनाथ ग्रस्त होता. सोलापूर शहरातील एका तज्ञ डॉक्टरांकडेदेखील सोमनाथने उपचार घेतले होते.

अखेर त्रास वाढत चालल्याने त्याला जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सोमनाथच्या भावाने माहिती देताना सांगितले की, वेल्डिंगचे काम करण्याची कला अवगत होती. त्याच्या कामावर अनेकजण खुश होते. परराज्यात जाऊन त्याने वेल्डिंगची कामे केली होती.

सोमनाथ पिसाळ याने बुधवारी दुपारी आईसोबत पोटभरून जेवण केलं. मोकळ्या मनाने चर्चा केली. त्यानंतर हळूच रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर गेला. शिशु विभागातील रूम क्रमांक सी- सहामध्ये जाऊन गळफास घेतला. रुग्णाने गळफास घेतल्याची बाब रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी ताबडतोब गळफास घेतलेल्या सोमनाथ पिसाळच्या नातेवाईकांना माहिती दिली व पोलिसांनी बोलावून घेतले. बार्शी शहर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *