ताज्याघडामोडी

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली
पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या तालुक्यांतील संस्था, शाळा, महाविद्यालय तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा रविवार, दि.२३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता व दुपारी १.३० वाजता स्वेरी मध्ये ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ सोहळा संपन्न होणार आहे. तरी या चार तालुक्यांसाठी होणाऱ्या दोन्ही सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’ च्या नियोजन समितीच्या वतीने केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन, माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
          गोपाळपूर (ता.पंढरपूर) मधील स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट व खेड (ता. उत्तर सोलापूर) मधील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या वतीने आयोजिलेला ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार वितरण सोहळा’ उद्या रविवार दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी संपन्न होणार आहे. सकाळी ९:०० वाजता पंढरपूर व माळशिरस तालुक्याकरिता तर दुपारी ०१:३० वाजता सांगोला व मंगळवेढा तालुक्याकरिता अशा दोन सत्रात हा ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’ संपन्न होणार आहे. पंढरपूर व माळशिरस तालुक्यांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिनेट, मॅनेजमेंट कौंन्सील स्थायी समिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या सदस्या, सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील प्रतिष्ठाण, शंकरनगर- अकलूजच्या अध्यक्षा आणि उच्च शिक्षण संस्थाचालक सेवाभावी संस्था, सोलापूरच्या अध्यक्षा श्रीमती पद्मजादेवी मोहिते-पाटील तसेच महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबईचे अध्यक्ष सुभाषराव माने, श्रीराम शिक्षण संस्था, पानीवचे अध्यक्ष प्रकाश पाटील, दि सासवड माळी शुगर फॅक्टरी, माळीनगरचे माजी चेअरमन राजेंद्र गिरमे, पंढरपूर एज्युकेशन सोसायटी, पंढरपूरचे सचिव सुधीर पटवर्धन, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख, पंचायत समिती माळशिरसचे माजी सदस्य रणजितसिंह जाधव आदी उपस्थित राहणार आहेत तर याचे अध्यक्षस्थान पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे हे भूषविणार आहेत. दुपारी १.३० वाजता होणाऱ्या दुसऱ्या सत्रात सांगोला व मंगळवेढा तालुक्यासाठी होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मंगळवेढ्यातील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. सुजित कदम, शाहू शिक्षण संस्था, पंढरपूरचे सचिव अभिजीत ढोबळे, सांगोला पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब काटकर, लक्ष्मी शिक्षक प्रसारक मंडळ, मंगळवेढाचे संस्थापक अभियंता बजरंग दत्तू व राजुरी (ता. सांगोला) चे गुरुकुल विद्यापीठ व ज्यु. कॉलेज चे संस्थापक महादेव बाड हे लाभले आहेत तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्याविकास मंडळ, मंगळवेढाचे अध्यक्ष राहुल शहा हे असणार आहेत. या दोन्ही सोहळ्याचे समन्वयक म्हणून श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) या संस्थेचे संस्थापक, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य तसेच खेड (ता. उत्तर सोलापूर) येथील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एस.व्ही.आय.टी.) चे अध्यक्ष डॉ. बी. पी. रोंगे हे असणार आहेत. तरी या दोन्ही कार्यक्रमाना उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समिती, स्वेरी, पंढरपूर व एस. व्ही.आय.टी., सोलापूर यांनी केले आहे. या ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळ्या’साठी सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे दिसून येत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *