पुणे: कॅन्टोन्मेंट हद्दीतील प्रमुख बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्केटला पहाटे पावणे चारच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत मार्केटमधील अंदाजे २५ दुकाने पूर्णपणे जळाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पुणे कॅन्टोन्मेंट आणि महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या आठ वाहनांच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ब्रिटिश […]
Tag: #fire
प्रवाशांनी भरलेल्या बेस्ट बसला आग
मुंबईतील भांडुपमध्ये प्रवाशांनी भरलेल्या 605 क्रमांकाच्या बेस्ट बसला अचानक भीषण आग लागली. परिसरातील नागरिकांनी तातडीने हालचाली करत ही आग विझवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. भांडुप स्टेशनवरुन वैभव चौकच्या दिशेने ही बस प्रवाशांना घेऊन निघाली होती. भांडुपच्या अशोक केदारे चौक परिसरात ही बस आली असता बसच्या दर्शनी भागातून धूर येऊ लागला आणि काही वेळातच या बसने पेट […]
महावितरणच्या गलथान कारभारामुळे लाखमोलाचा ऊस जळून खाक
जालना, 07 मार्च : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेम्भी गावात महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे काका आणि पुतण्याचा 3 एकर ऊस डोळ्या देखत जळून खाक झाला आहे. मेहनतीने उगवलेल्या पिकाची डोळ्यादेखत राखरांगोळी झाली आहे. जगन्नाथ कळंब आणि रघुनाथ कळंब अशी या पीडित शेतकऱ्यांची नावे असून दोघांनी आपल्या वाट्याच्या दीड-दीड एकर शेतात उसाची लागवड केलेली होती. […]
पुण्यात पेटत्या बसचा थरार,तरुणाचा मृत्यू
पुण्यातल्या खराडी भागामध्ये अपघात झाल्यामुळे पेटलेली पीएमपीची एक बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. नगर रस्त्यावरच्या खराडी बायपास जवळ ही घटना घडली आहे. यामध्ये बस खाली आलेल्या दुचाकी चालक तरुण यामध्ये मृत्युमुखी पडलेला आहे. नगर रस्त्यावरील खराडी दर्गा येथील बालाजी हॉस्पिटल समोर आज सकाळी सव्वादहाच्या सुमारास पी एम पी एम एल बस आणि दुचाकीची धडक […]
पंढरपुरातील ”ती” आगीची घटना संशयास्पद ?
दि. 11 फेब्रुवारी 2021 रोजी पहाटे पंढरपूर येथील भोसले चौकात काशीकापडी समाज बांधवांच्या जुन्या कपड्यांच्या गोडाऊनला अचानक मोठी आग लागली होती. या आगीत काशीकापडी समाजातील महिला भगिणींचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. ही आग लागली का लावली गेली? हा प्रश्न निर्माण होत असुन याची सखोल […]
2 कोटी रुपये गाडीच्या बोनेटमध्ये ठेवून सुरू होता प्रवास, इंजिनने घेतला पेट
सिवनी, 02 फेब्रुवारी: सिवनी-नागपूर महामार्गावर रविवारी रात्री एक अजब प्रकार पाहायला मिळाला. सिवनी जिल्ह्यातील बनहानी गावातील काही लोकांनी एका कारमधून जळलेल्या 500 रुपयांच्या नोटा रस्त्यावर उडत असल्याचं पाहिलं. कारमधील लोकांनी बोनेट उघडून पाहिलं, तर सुसाट वाऱ्यामुळे 500 रुपयांच्या नोटा रस्त्यावरच उडायला लागल्या. हे दृश्य पाहून गावातील एका व्यक्तीने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. या प्रकरणात […]
सीरम इन्स्टीट्यूटमध्ये लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू
पुणे : सीरम इन्स्टीट्यूटमध्ये ईमारतीला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे. 6 व्या मजल्यावर जळालेल्या अवस्थेत हे मृतदेह आढळले. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. कोरोनाची लस तयार करणाऱ्या सीरम इन्स्टीट्यूटमध्ये ही आग लागली होती. पण अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या इमारतीत आग लागल्याने मोठी […]