करकंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे होत असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाईचे आदेश करकंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांनी दिले होते व यासाठी पोलीस ठाण्यातील हद्दीतील गावात पेट्रोलींग करत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री मुंडे,पो.ना स्वप्निल जयंत वाघमारे,चालक पो.कॉ. ताकभाते हे दिनांक ३१ जानेवारी रोजी सहा वाजनेच्या सुमारास पेट्रोलींग करत भोसे पाटी […]
Tag: #crime
सावकाराने १२ लाख परत करूनही २२ जर्सी गायी,बुलेट आणि बोलेरो गाडी ओढून नेली
पंढरपूर गामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल पंढरपूर तालुक्यातील शेंडगेवाडी येथील इसम नामे धुळा रामचंद्र शेंडगे वय.33 वर्ष व्यवसाय शेती यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार संतोष किसन गोरे व त्यांच्या पत्नीकडून फिर्यादी धुळा शेंडगे यांनी १० लाख रुपये रक्कम दिन टप्प्यात मासिक ५ टक्के व्याज दराने २०१७ मध्ये घेतली होती.फिर्यादीने १२ लाख इतकी रक्कम वेळोवेळी थोडी […]
दोन महिला तूप विकायला आल्या आणि घर साफ करून गेल्या
जळगाव, 30 जानेवारी : आजच्या काळात माणुसकी दाखवणारे लोक कमीच सापडतात. मात्र या लोकांनी माणुसकी दाखवल्यावर त्याची परतफेड चांगलीच असेल हेसुद्धा सांगता येत नाही. असाच एक प्रकार जळगाव जिल्ह्यामध्ये घडला आहे. जळगाव जिल्ह्यात नशिराबाद इथे दारोदार फिरत दोन महिला तूप विकत होत्या. या महिलांनी एका घरी आपण थकलो असून काही खायला मिळेल का अशी विचारणा […]
अॅक्टिंगच्या नावाखाली फसवणूक
चित्रपट आणि मालिकांमध्ये काम देण्याच्या बहाण्याने स्ट्रगलिंग अॅक्ट्रेसला देहविक्री व्यापारात ढकलल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने 3 कास्टिंग डायरेक्टर्सना अटक केली आहे. या कारवाईत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. आरोपींनी पीडित मुलीला साडेतीन लाखात विकले असल्याचेही तपासात समोर आले आहे. सदरील घटना गुरुवारी रात्रीची आहे. समाजसेवा शाखेचे डीसीपी राजू भुजबळ यांनी सांगितले […]
पिस्तूल दाखवून शिवसैनिकांनी केली गाडी ओव्हरटेक
वाहतूक कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी एक कारचालक व त्याचा सहकारी इतर वाहनचालकांना चक्क पिस्तुलाचा दाखवत असल्याचं समोर आलं आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर हा प्रकार घडला असून याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. पिस्तूलबाज वाहनचालकाच्या गाडीवर शिवसेनेचा लोगो असल्यानं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे
महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेच्या नेत्याला गोळ्या घालण्याची धमकी
महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अजित नवले यांना फेसबुक पोस्टद्वारे नीट रहा नाहीतर गोळ्या घालील अशी धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून या घटनेनंतर मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी निषेध केला आहे. महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अजित नवले हे कम्युनिष्ट पक्षाचे प्रदेश सचिव असून शेतकरी चळवळीचे राज्यातील […]
मुलांनीच आईला गंडवलं, लाखो रुपयांसह 150 तोळे सोने लंपास!
मुलगा, नातू आणि दोन सुनांनी मिळून वृध्देची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या लोकांनी 168 तोळे सोने, 70 लाख रोकड परस्पर खात्यावरुन घेतल्याची तक्रार वृद्ध महिलेने केली. याप्रकरणी दोन सुना, नातू आणि नातवाच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. स्वतःचा मुलगा, नातू आणि दोन सुनांनी बनावट कागदपत्रे तयार करुन 80 वर्षीय वृद्ध महिलेची कोट्यवधीची […]
मुलीच्या लग्नासाठी मालकाच्या मुलांनाच केलं किडनॅप, एक कोटींची मागितली खंडणी
मुंबई, 28 जानेवारी : मुलीच्या लग्नासाठी तिच्या वडिलांकडं पैसे नव्हते. त्यामुळे लग्नातील खर्चामध्ये कपात करणे किंवा वैध मार्गांनं कर्ज घेणे हा पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध होता. हा पर्याय टाळून ड्रायव्हर असलेल्या वडिलांनी मालकाच्या जुळ्या मुलांना किडनॅप केलं. या प्रकरणातील आरोपी व्यक्ती एका बिल्डरच्या गाडीची ड्रायव्हर होती. त्यानं इंटनॅशनल कॉलिंग अॅपच्या मदतीनं मालकाकडं एक कोटीचीं खंडणी मागितली. […]
भाजपच्या प्रदेश प्रवक्त्यावर जीवघेणा हल्ला!
मुंगेर, 27 जानेवारी: शेतकरी आंदोलनामुळे कालपासून देश पेटलेला असताना, अशातच भारतीय जनता पक्षाच्या एका बड्या नेत्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. ही घटना मुंगेरच्या इव्हनिंग कॉलेजजवळ घडली आहे. मारेकऱ्यांनी भाजपचा अल्पसंख्याकाचा चेहरा आणि प्रदेश प्रवक्ता असणाऱ्या अजफर शमशी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात अजफर शमशी गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात […]
हॉटेलमध्ये घुसून चोरटयांनी रोख रक्कम केली लंपास
दि.२४ रोजीरात्री हॉटेल बंद करण्यात आल्यानंतर रात्रीच्या वेळी दोन अज्ञात चोरट्यांनी रस्त्याच्या बाजूकडून पार्कींगच्या गेटचे कूलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर आत प्रवेश करून काऊंटरची उचकापाचक करून ३ हजार रूपये रोख व एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा ऐवज लंपास केला.याबाबत वॉचमन आडेप यांच्या फिर्यादीरून कोतवाली पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.