गुन्हे विश्व

सावकाराने १२ लाख परत करूनही २२ जर्सी गायी,बुलेट आणि बोलेरो गाडी ओढून नेली

पंढरपूर गामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

पंढरपूर तालुक्यातील शेंडगेवाडी येथील इसम नामे धुळा रामचंद्र शेंडगे वय.33 वर्ष व्यवसाय शेती यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार संतोष किसन गोरे व त्यांच्या पत्नीकडून फिर्यादी धुळा शेंडगे यांनी १० लाख रुपये रक्कम दिन टप्प्यात मासिक ५ टक्के व्याज दराने २०१७ मध्ये घेतली होती.फिर्यादीने १२ लाख इतकी रक्कम वेळोवेळी थोडी थोडी परत करूनही २० गुंठे शेतजमीन संतोष गोरे याना खरेदी करून दिली.त्यानंतर तुमची रक्कम तुम्हाला व्याजासह परत केली आहे असे फिर्यादीने सांगितल्यानंतर संतोष गोरे याने 22 जर्श्या गायी त्यांनी मला दमदाटी करुन नेल्या आहेत तू आणखी ५ लाख रुपये येणे आहे असे सांगत दिनांक 11/01/2021 रोजी फिर्यादीच्या नावे असलेले बोलेरो गाडी नं. MH 13 DE 0584 व रयल इन्फिल्ड बुलेट मोटारसायकल गाडी नं. MH45 Y5573 ही दोन्ही वाहने व्याजाच्या पैशात मला दे नाहीतर मार खावा लागेल अशी दमदाटी करुन जबरदस्तीने सदरची वाहने घेवुन गेला अशा आशयाची फिर्याद पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
या प्रकरणी तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण अवचर(प्रभारी) पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे तसेच पोलीस उपनिरीक्षक एस.पी.आटपाडकर यांच्या सुचनेनुसार स.पो. नि.श्री दिवसे हे करीत असून सदर प्रकरणातील बोलेरो व बुलेट पोलिसांनी ताब्यात घेत आरोपी संतोष गोरे यास अटक केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *