गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अ‍ॅक्टिंगच्या नावाखाली फसवणूक

चित्रपट आणि मालिकांमध्ये काम देण्याच्या बहाण्याने स्ट्रगलिंग अ‍ॅक्ट्रेसला देहविक्री व्यापारात ढकलल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने 3 कास्टिंग डायरेक्टर्सना अटक केली आहे. या कारवाईत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. आरोपींनी पीडित मुलीला साडेतीन लाखात विकले असल्याचेही तपासात समोर आले आहे. सदरील घटना गुरुवारी रात्रीची आहे.

समाजसेवा शाखेचे डीसीपी राजू भुजबळ यांनी सांगितले की, 14 वर्षांच्या मुलीची विक्री करणार असल्याची खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती. यानंतर एका पोलिस कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक बनवून त्यांच्याकडे पाठवले आणि कास्टिंग डायरेक्टर आशिष पटेल, विनोद अनेरिया आणि मो.शेख यांना सौदा करताना पोलिसांनी अटक केली.

सौद्यादरम्यान एका आरोपीने म्हटले की, ते चौदा वर्षांच्या मुलीला वेश्या व्यवसायासाठी पुरवतील आणि ते प्रत्येक वेळी साडेतीन लाख रुपये घेतील. एका आरोपीने सांगितले की – ते चौदा वर्षांच्या मुलीला वेश्या व्यवसायासाठी पुरवतील आणि ते प्रत्येक वेळी साडेतीन लाख रुपये घेतील. आरोपी हे वारंवार सांगतच राहिले, कारण मुलगी चौदा वर्षांची आणि अल्पवयीन असल्याने तिच्यासाठी प्रत्येक वेळी साडेतीन लाख रुपयांची मागणी केली जाईल.या व्यवहारानंतर पोलिस पथकाने अंधेरी येथील हॉटेलमध्ये सापळा रचला. येथेच पीडितेसोबत आरोपी कास्टिंग डायरेक्टरला बोलावले होते. पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या एका व्यक्तीला ग्राहक म्हणून अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील रेस्टॉरंटमध्ये पाठवले. तीन आरोपी कास्टिंग डायरेक्टर त्या अल्पवयीन मुलीसह तेथे पोहोचताच पोलिस पथकाने त्वरित तिघांना अटक केली आणि पीडित मुलीला त्यांच्या तावडीतून सोडवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *