गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेच्या नेत्याला गोळ्या घालण्याची धमकी

महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अजित नवले यांना फेसबुक पोस्टद्वारे नीट रहा नाहीतर गोळ्या घालील अशी धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून या घटनेनंतर मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी निषेध केला आहे.     

महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अजित नवले हे कम्युनिष्ट पक्षाचे प्रदेश सचिव असून शेतकरी चळवळीचे राज्यातील अग्रणी नेते म्हणून ते ओळखले जातात गुरुवारी त्यांच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट टाकून गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली होती.

 

या बाबत  माजी आमदार आडम यांनी पक्षाच्या सोशल अकाउंटवर पोस्ट केले असून  एक पत्र  दिले असून त्या नुसार 
       डॉ. अजित नवले यांना गोळ्या घालण्याच्या फेसबुकवरील धमकीचा जळजळीत निषेध
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिवमंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस, अखिल भारतीय किसान सभेचे केंद्रीय कमिटी सदस्य आणि महाराष्ट्रातील एक लढाऊ आणि प्रामाणिक शेतकरी नेते कॉ. डॉ. अजित नवले यांना “नीट राहा नाहीतर गोळ्या घालीन” या शब्दांत एका इसमाने काल फेसबुकवर पोस्ट टाकली आणि इतर दोघा जणांनी ती लाईक केली. या तिघांपैकी किमान दोन जण तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत असे आम्ही केलेल्या तपासाअंती कळले.
देशभर सध्या भाजपच्या केंद्र सरकारविरुद्ध सुरू असलेल्या अभूतपूर्व देशव्यापी शेतकरी आंदोलनाच्या आणि हे आंदोलन दडपून टाकण्याच्या केंद्र सरकारच्या कुटील कारस्थानाच्या पार्श्वभूमीवर धमकीची ही पोस्ट टाकण्यात आली आहे हे सूचक आहे.
उद्या ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांचा हौतात्म्य दिन आहे. त्यांचा खून करणाऱ्या शक्तीच आज अशा धमक्या देत सुटल्या आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कॉ. डॉ. अजित नवले यांना देण्यात आलेल्या या धमकीचा जळजळीत निषेध करत आहे आणि महाराष्ट्रातील सर्व देशप्रेमी आणि लोकशाही जनतेला या घटनेचा तीव्र निषेध करण्याचे आवाहन करत आहे.
फेसबुकवरून अशा धमक्या देणाऱ्या व त्या लाईक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ताबडतोब कायदेशीर कारवाई सुरू करणार आहे.
माजी आमदार कॉ. नरसय्या आडम
महाराष्ट्र राज्य सचिव
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *