आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांचा आशीर्वाद घेऊन भाजप खासदार संभाजी छत्रपती आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्यात ते राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या भावना जाणून घेणार आहेत. त्यानंतर येत्या 27 मे रोजी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षनेते आणि इतर ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा करणार आहेत. संभाजी छत्रपती यांनी आज कोल्हापूर […]
Tag: #aarakshan
तर संभाजी महाराज आडवा येईल, छत्रपती संभाजीराजेंची गर्जना, आमदार-खासदारांनी माघार घेतली तर बघाच
नाशिक: मराठा आरक्षणासंदर्भात भाजपने त्यांची भूमिका घ्यावी. मी काही त्यांचा ठेका घेतलेला नाही. भाजपने मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये, यावर तोडगा सांगावा, असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले. गेल्या सरकारने बोगस कायदा केला का या सरकारने सर्वोच्च न्यायालयात नीटपणे भूमिका मांडली नाही, याच्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकमेकांवर केवळ ढकलाढकली […]
मोठी बातमी : केंद्र सरकारकडून मराठा आरक्षण संदर्भात फेरविचार याचिका दाखल
नवी दिल्ली : दिल्लीतून महाराष्ट्रासाठी एक मोठी बातमी पुढे येत आहे. केंद्र सरकारनं मराठा आरक्षण प्रकरणी फेरविचार याचिका दाखल केली आहे. १०२ व्या घटना दुरूस्ती नुसार राज्याला आरक्षण देण्याचा अधिकार आहे. राज्याचे आरक्षण देण्याचे अधिकार काढून घेतले नाही. राज्याच्या अधिकाराला बाधा पोहोचवता येणार नाही. अशी भूमिका केंद्र सरकार कोर्टात मांडणार आहे. याआधी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण […]
मराठा आरक्षण : गरज पडल्यास एकदिवसीय अधिवेशन बोलावणार – अजित पवार
पुणे – सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने बुधवारी मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा महाराष्ट्र सरकारचा ‘सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग कायदा २०१८’ रद्दबातल ठरवला. मराठा समाजाला ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून आरक्षण देण्याच्या निर्णयाचे समर्थन करणारी कोणतीही असामान्य परिस्थिती दिसत नसल्यामुळे हे आरक्षण घटनाबाह्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात सर्वोच्च न्यायालयाचा […]
सरकारच्या मूर्खपणामुळं आणि नालायकपणामुळं आरक्षण रद्द
बीड, 06 मे: राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात केलेला कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केल्याचा निकाल बुधवारी दिला. दरम्यान, ‘जे आरक्षण देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांच्या प्रयत्नांमुळ मिळालं होतं, ते या आघाडी सरकारच्या मूर्खपणामुळं, नालायकपणामुळं आणि या सरकारने सर्वोच न्यायालयामध्ये योग्य बाजू न मांडल्यामुळं रद्द झालं आहे. हा मराठा समाजासाठी काळा दिवस आहे’, अशी सडकून टीका आमदार […]
सुपर न्युमररी आरक्षण देणं हाच आता मराठा समाजाला न्याय देण्यासाठी एकमेव पर्याय
राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने सर्वात महत्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला खूप मोठा धक्का बसला आहे. मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणी न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर […]
राज्य सरकारनं बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाकडून रद्द
नवी दिल्ली : अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करीत होता. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली होती. यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने 26 मार्चला निकाल राखून ठेवला होता. अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला आहे. महाराष्ट्राने संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करून विधीमंडळाच्या दोन्ही […]
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ‘सर्वोच्च’ निकाल, राज्य सरकार प्रचंड आशावादी
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्या सर्वोच्च न्यायालय अंतिम निकाल देणार आहे. उद्या सकाळी साडे दहा वाजता सर्वोच्च न्यायालय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 26 मार्चला निकाल राखून ठेवला होता. मराठा आरक्षण वैध ठरवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या अंतिम निकाल येईल. अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर […]
ओबीसी समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही पहारेकरी उभे आहोत- ना.विजय वडेट्टीवार
“एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात बारा बलुतेदारांच्या जाती असताना ओबीसी समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही पहारेकरी उभे आहोत. बहुजन कल्याण विभाग मंत्री म्हणून ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलेली आहे. आवश्यकता पडल्यास स्वतंत्र जनगणनेचा प्रस्ताव मी विधानसभेत मांडेल. जेथे संधी मिळेल तेथे ओबीसी समाजाचा आवाज उचलून धरणार. पक्ष, जात विसरून फक्त […]
मराठा आरक्षणासंदर्भात उद्या नवी दिल्लीत वकिलांची बैठक
मुंबई, दि. 10 : सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या पुढील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उद्या, 11 जानेवारी रोजी नवी दिल्लीत बैठक होणार आहे. सोमवारी सायंकाळी 5 वाजता नवीन महाराष्ट्र सदनमध्ये होणाऱ्या या बैठकीला उपसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे-पाटील, अनिल परब […]