ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारला विरोधी पक्षाला घेरलेले असतानाच मोठे पाऊल उचलत आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा सरकारने ज्या पद्धतीने आरक्षणाचे अध्यादेश काढले आहेत, त्याच धर्तीवर हा अध्यादेश काढला जाणार आहे. ही माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा […]
Tag: #aarakshan
‘आरक्षण नाही, जीवनयात्रा संपवतोय’, मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या
मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षण नसल्यानं एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील येणोरा गावात घडलीये. सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या सदाशिव शिवाजी भुंबर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो 22 वर्षांचा होता.’आरक्षण नसल्याने जीवनयात्रा संपवतोय’, अशी सुसाईड नोट लिहून त्याने आपल्या आयुष्याचा शेवट केला. […]
खासदार संभाजीराजे 2 सप्टेंबरला घेणार राष्ट्रपतींची भेट
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाचा विषय राष्ट्रपतींकडे मांडण्यासाठी व समाजाच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रपती भवनकडे पत्रव्यवहार करून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरूवार, दि. २ सप्टेंबर रोजी भेटीची वेळ दिली असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवरून दिली. यावेळी, खासदार संभाजीराजे यांनी आपल्यासोबत राष्ट्रपतींच्या भेटीसाठी महाराष्ट्रातील […]
केंद्रीय कॅबिनेटमध्ये मराठा आरक्षण संदर्भात महत्वाचे विधेयक मंजूर -संभाजीराजे छत्रपती
राज्य आणि केंद्रात मराठा आरक्षणावरुन सातत्याने टोलवाटोलवी सुरु आहे. अशा परिस्थिती आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात महत्वाच्या असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्नावर चर्चा झाली. त्याबाबतचा महत्वाचा निर्णय आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने घेतला आहे. मागास प्रवर्ग ठरवून आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळ समितीने मंजूर केला. याबाबत आज केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजीजू यांची […]
मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र
महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा आणि मराठा आरक्षणासाठी योगदान व सहकार्य द्यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. चव्हाण यांनी शनिवारी राज्यातील सर्व पक्षांचे लोकसभा व राज्यसभा सदस्यांना ईमेल तसेच कुरियरमार्फत पत्र पाठवले […]
मराठा मूक आंदोलन पुढे ढकलले; सरकारला एक महिन्याची डेडलाइन
नाशिक – मराठा आरक्षणासाठी पुणे ते विधानभवन लॉंगमार्च काढावा, अशी आमची इच्छा नाही. सरकारने एक महिन्यात आमच्या मागण्या मार्गी लावाव्यात. आमची आंदोलने थांबली नाहीत. बैठकाही सुरूच राहणार आहेत. मात्र, सरकार 21 दिवसांत प्रश्न मार्गी लावत असल्याने एक महिना मराठा मूक आंदोलन पुढे ढकलत आहोत, असे जाहीर करतानाच या महिनाभरात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर […]
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा; वडेट्टीवारांचं मोठं विधान
नागपूर: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे. आम्ही मंत्री असलो तरी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. तसेच निवडणुका न घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. ही चर्चा सकारात्मक होती, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. […]
“.अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील”; खासदार उदयनराजेंचा पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना इशारा
मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी काल मुक आंदोलन पार पडल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मराठा क्रांती मोर्चाचे विविध समन्वयक यांची एक महत्वपूर्ण बैठक मुंबईत होणार आहे. दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी सहा मागण्या केल्या आहेत. या मागण्या पूर्ण करा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा […]
मागण्या मान्य करण्याची सरकारची तयारी; उद्या वर्षावर होणार महत्त्वपूर्ण बैठक
पुणे, 16 जून: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापूर येते संभाजीराजे यांच्या उपस्थितीत मराठा क्रांती मूक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर आता राज्य सरकारने संभाजीराजेंसह मराठा समन्वयकांना चर्चेसाठी बोलावलं आहे. छत्रपती संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चा समन्वयकानी ज्या मागण्या मांडल्या त्या मान्य करण्याची तयारी दर्शवली आहे. उद्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही महत्त्वपूर्ण बैठक होणार […]
केंद्र आणि राज्य सरकारने वेळीच भूमिका न घेतल्याने मराठा आरक्षण गेलं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
कोल्हापूर: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने वेळीच भूमिका न घेतल्याने मराठा आरक्षण गेलं. त्याला दोन्ही सरकारे दोषी आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आज कोल्हापुरात मराठा मूक मोर्चा पार पडला. प्रकाश आंबेडकर या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. […]