मध्यप्रदेशमध्ये नकली रेमेडेसीविर इंजेक्शन प्रकरण चर्चेत असताना तपास अधिकाऱ्यांना आता कात्रीत सापडण्याची पाळी आली आहे. नकली रेमेडीसीवर घेणाऱ्या रुग्णांची प्रकृती त्याच इंजेक्शनने सुधारली आहे. संक्रमणावर त्यांनी मात दिली आहे. आता पोलिस कुणावर अन कशी कारवाई करणार हा पेच प्रशासनासमोर उभा झाला आहे. मुख्यमंत्री शिवराज यांच्या निर्देशांचे पालन कसे करावे यातून पोलिस चक्रावले आहेत. भोपाळ. मध्यप्रदेशचे […]
Tag: #corona
कोरोना नियम मोडल्याने दीड लाखांच्या खंडणीची मागणी, जबाबदार कर्मचाऱ्यांना अटक
मुंबई : दीड लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी मुंबईत एमआयडीसी पोलिसांनी मुंबई महापालिकेच्या चौघा क्लीन-अप मार्शलना अटक केली आहे. कोरोनासंबंधी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून हे क्लीन-अप मार्शल खंडणीच्या स्वरुपात पैशांची मागणी करत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्यामुळे आणि नागरिक नियमांचे पालन करत नसल्यामुळे सरकारच्या वतीने 31 मेपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. […]
आधार कार्ड नसेल तरीही आता कोरोनाची लस मिळणार, UIDAI चे स्पष्टीकरण
नवी दिल्ली : युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया अर्थात यूआयडीएआयने स्पष्ट केलं आहे की एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड नसेल तर त्याला कोरोनाच्या लसीपासून वंचित ठेवता येऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्याकडे आधार कार्ड नसेल तरीही त्या व्यक्तीला कोरोनाची लस मिळणार आहे. तसेच कोणत्याही रुग्णाला, त्याच्याकडे केवळ आधार कार्ड नाही या कारणाने त्याला रुग्णालयात भरती न करणे किंवा औषधांची […]
मोदीजी हमारे बच्चोंके व्हॅक्सिन विदेश क्यु भेज दिया !
दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या विरोधात मोठ्या प्रमाणात पोस्टर्स लावण्यात आल्याचे आढळून आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ही पोस्टर्स लावणाऱ्यांच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी 17 गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत पंधरा जणांना अटक केली आहे. ही पोस्टर्स प्रामुख्यान लसींच्या तुटवड्याबद्दल तक्रार करणारी आहेत. मोदीजी हमारे बच्चोंके व्हॅक्सिन विदेश क्यु भेज दिया असा प्रश्न यात पंतप्रधानांना उद्देशून […]
कोविशिल्डच्या दुसऱ्या लसीमधील अंतर वाढवले
नवी दिल्ली : कोविशिल्ड लसच्या दोन डोसमधील अंतर पुन्हा एकदा वाढविण्यात आले आहे. आता दोन्ही डोस दरम्यान 12 ते 16 आठवडे अंतर ठेवण्यात येईल. दोन डोसमधील अंतर वाढल्यामुळे ही लस अधिक प्रभावी होईल, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दोन डोसमधील अंतर वाढविल्यानंतर ज्यांनी दोन आधीच घेतले आहेत त्यांचे काय? असा प्रश्न निर्माण झालाय. ज्यांनी कोविशिल्डचे दोन्ही डोस […]
कोरोनाच्या संकटकाळात केंद्राने वाढवल्या रासायनिक खतांच्या किंमती
मुंबई : केंद्र सरकारने कोरोनाच्या संकटकाळात रासायनिक खतांच्या किंमती वाढवल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हे वाढवलेले खतांचे दर कमी करावेत अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी एका पत्राद्वारे केली आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत केंद्र सरकारने 700 ते 800 रुपयांची वाढ केली आहे. शेतीची कामे जरी गेल्या दीड वर्षापासून सुरु असली […]
स्फुटनिक लसीची किंमत ठरली, दोन डोससाठी मोजावे लागणार इतके रुपये
मुंबई : देशात कोरोना विषाणूचा कहर पाहताल लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी सध्या प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील दिसत आहेत. याच धर्तीवर परदेशी लसींच्या वापरासाठीही देशात रितसर परवानगी देण्यात आली आहे. यातच रशियात निर्मिती करण्यात आलेली स्पुटनिक ही लसही आता भारताच पोहोचली आहे. किंबहुना नुकतीच या लसीची भारतातील किंमत निर्धारित करण्यात आली आहे. स्फुटनिक लसीच्या एका डोसची मूळ किंमत ही […]
लव्ह यु जिंदगी म्हणणार्या तरुणीचा कोरोनाशी लढा अयशस्वी, रुग्णालयात मृत्यू
दिवसेंदिवस देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. एका 30 वर्षीय तरुणीला रुग्णालयात आयसीयू बेड मिळत नव्हता. तरी लव्ह यु जिंदगी म्हणत तिचा कोरोनाशी लढा सुरू होता. पण तिचा हा लढा अयशस्वी झाला असून तिचा मृत्यू झाला आहे. ट्विटरवर डॉ. मोनिका लांगेह यांनी एका 30 वर्षीय कोरोना रुग्णाचा व्हिडीओ शेअर केला होता. तिला रुग्णालयात आयसीयू बेड मिळाला […]
स्पुतनिक लसीबाबत केंद्र सरकारची महत्वाची घोषणा, लवकरच…
नवी दिल्ली – रशियाद्वारे निर्मित स्पुतनिक लस भारतात पोहोचली असून पुढील आठवड्यापासून ती लस लोकांना दिली जाईल, अशी अपेक्षा आहे. तसेच जुलैमध्ये स्पुतनिक लसीचं उत्पादन भारतात होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती नीति आयोगाचे सदस्य वी के पॉल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. नीति आयोगाचे सदस्य वी के पॉल यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पॉल यांनी भारतात […]
राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला, अशी आहे नियमावली!
मुंबई, 13 मे: राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हे 15 मे पर्यंत कायम होते त्यानंतर आता हे निर्बंध वाढवून 1 जूनपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दलची नियामवली जाहीर करण्यात आली आहे. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 1 जूनपर्यंत […]