ताज्याघडामोडी

स्फुटनिक लसीची किंमत ठरली, दोन डोससाठी मोजावे लागणार इतके रुपये

मुंबई : देशात कोरोना विषाणूचा कहर पाहताल लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी सध्या प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील दिसत आहेत. याच धर्तीवर परदेशी लसींच्या वापरासाठीही देशात रितसर परवानगी देण्यात आली आहे. यातच रशियात निर्मिती करण्यात आलेली स्पुटनिक ही लसही आता भारताच पोहोचली आहे. किंबहुना नुकतीच या लसीची भारतातील किंमत निर्धारित करण्यात आली आहे.

स्फुटनिक लसीच्या एका डोसची मूळ किंमत ही 948 रुपये इतकी आहे.

पण, लसीच्या दरात कराची जोड दिल्यास ही किंमत काहीशी वाढत आहे. सध्या स्फुटनिक लसीच्या जवळपास दीड लाख व्हायल्स भारतात आल्या आहेत. या लसीच्या एका डोससाठी 948 रुपये आणि त्यावर 5 टक्के जीएसटी असं मिळून एका स्फुटनिक लसीसाठी 995 रुपये मोजावे लागणार आहेत.

स्फु़टनिक लसी चेही दोन डोस घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे या लसींसाठी जवळपास 2 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. या लसीच्या उत्पादनाच्या दृष्टीने सध्या 6 वेगवेगळ्या कंपन्यांशी यासाठीचे करार करण्याची चर्चा आणि प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळं या लसीचं उत्पादन वाढल्यास, किंमत काही अंशी कमी करण्यात येण्याची शक्यता आहे.

जगभरात वापरात असणाऱ्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींपैकी स्फुटनिक ही 92 टक्के म्हणजेच सर्वाधिक प्रभावी लस ठरत आहे.मंगळवारीच केंद्रीय आरोग्य मंत्रायलयानं स्फुटनिक लस देशात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. पुढील आठवड्यापासून या लसीच्या विक्रीला सुरुवात होणार असल्याची शक्यताही आरोग्य मंत्रालयाकडून वर्तवण्यात आली. त्यामुळं आता देशात लसींच्या तुटवड्याच्या मुद्द्यावरुन सुरु असणारा अडचणींचा काळ हा दूर जाण्याची चिन्हं दिसत आहेत.

लसीचा तुटवडा संपणार …

देशात लसीचा तुटवडा जाणवत आहे. अनेक राज्यात लसीकरण थंबवण्यात आलं आहे, तर काही ठिकाणी लसीकरण मंदावली आहे. अनेक राज्ये ग्लोबल टेंडर काढण्याच्या तयारीत आहेत. याचद रम्यान एक दिलासादायक बातमी आहे. पाच महिन्याच्या आत लसीचा तुटवडा दूर होईलच पण देशाच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त, 216 कोटी डोस उपलब्ध होतील, असा दावा सरकारने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *