गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

खळबळजनक! बनावट रेमडेसिविर इंजेक्शन घेणाऱ्यांची कोरोनावर मात, ९०% रुग्ण बरे; पोलिसांसमोर पेच

मध्यप्रदेशमध्ये नकली रेमेडेसीविर इंजेक्शन प्रकरण चर्चेत असताना तपास अधिकाऱ्यांना आता कात्रीत सापडण्याची पाळी आली आहे. नकली रेमेडीसीवर घेणाऱ्या रुग्णांची प्रकृती त्याच इंजेक्शनने सुधारली आहे. संक्रमणावर त्यांनी मात दिली आहे. आता पोलिस कुणावर अन कशी कारवाई करणार हा पेच प्रशासनासमोर उभा झाला आहे. मुख्यमंत्री शिवराज यांच्या निर्देशांचे पालन कसे करावे यातून पोलिस चक्रावले आहेत.

भोपाळ‌. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी नकली रेमडेसीविरचे इंजेक्शन विकणाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाला दिल्या होत्या.पण कारवाई दरम्यान हाती आलेल्या निष्कर्षामुळे पोलिसांची मात्र झोपच उडाली आहे. बनावट इंजेक्शनची मात्रा घेणारे 90% रुग्ण त्याच इंजेक्शनने बरे झाल्यांमुळे गुन्हे दाखल करणार कसे? हा पेच पोलीस प्रशासनासोर उभा झाला आहे. यात ज्यांचा मृत्यू झाला त्यांचे पार्थिव जाळून टाकल्यामुळे त्यांचा मृत्यू बनावट इंजेक्शनमुळे झाला, हे स्पष्ट होऊ शकत नाहीगुन्हा कसा दाखल करणार?

मध्यप्रदेशमध्ये नकली रेमेडेसीविर इंजेक्शन प्रकरण चर्चेत असताना तपास अधिकाऱ्यांना आता कात्रीत सापडण्याची पाळी आली आहे. नकली रेमेडीसीवर घेणाऱ्या रुग्णांची प्रकृती त्याच इंजेक्शनने सुधारली आहे. संक्रमणावर त्यांनी मात दिली आहे. आता पोलिस कुणावर अन कशी कारवाई करणार हा पेच प्रशासनासमोर उभा झाला आहे. मुख्यमंत्री शिवराज यांच्या निर्देशांचे पालन कसे करावे यातून पोलिस चक्रावले आहेत.

हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे होते आदेश

इंदूर आणि जबलपूरमध्ये नकली रेमडेसीविर विकणाऱ्यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री चौहान यांनी दिले होते. ज्या लोकांनी नकली इंजेक्शन घेतले त्यांचे पार्थिव जाळण्यात आले नव्हते. मध्यप्रदेशात नकली इंजेक्शन प्रकरणी ज्या लोकांना पकडले त्यांचा संबंध गुजरातसोबत जोडल्या गेला होता.आरोपींनी दिली होती कबुली

एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बनावट इंजेक्शन घेणाऱ्या दहा जणांचा इंदूरमध्ये मृत्यू झाला असला तरी येथे शंभर रुग्णही बरे झालेत. बनावट इंजेक्शनच्या शिशांमध्ये ग्लुकोजचे पाणी भरले होते. आता डॉक्टरांना सांगावे लागेल कि ग्लुकोज पाण्याने इन्फेक्शन कमी कसे काय झाले? असे मत पोलिसांनी नोंदविले आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीनी इंदूरमध्ये 700 तर गुजरातमध्ये 500 बनावट रेमेडेसिवीर इंजेक्शन विकल्याचीही कबुली दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *