ताज्याघडामोडी

लव्ह यु जिंदगी म्हणणार्‍या तरुणीचा कोरोनाशी लढा अयशस्वी, रुग्णालयात मृत्यू

दिवसेंदिवस देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. एका 30 वर्षीय तरुणीला रुग्णालयात आयसीयू बेड मिळत नव्हता. तरी लव्ह यु जिंदगी म्हणत तिचा कोरोनाशी लढा सुरू होता. पण तिचा हा लढा अयशस्वी झाला असून तिचा मृत्यू झाला आहे.

ट्विटरवर डॉ. मोनिका लांगेह यांनी एका 30 वर्षीय कोरोना रुग्णाचा व्हिडीओ शेअर केला होता. तिला रुग्णालयात आयसीयू बेड मिळाला नाही. म्हणून तिला NIV वर ठेवण्यात आले होते. असे असले तरी कोरोनाशी लढण्यात तिची दृढ इच्छा शक्ती होती.

वॉर्डमध्ये दाखल झाल्यानंतर तिने विचारले होते की मनोबल वाढवण्यासाठी गाणी लावू शकते का?

डॉक्टरांनी होकार दिल्यानंतर तिने लव्ह यु जिंदगीचे टायटल साँग लावले आणि त्या गाण्याचा ती आनंद घेत होती. त्याचा एक व्हिडीओ डॉ. मोनिका लांगेह यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला होता. हा व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

नंतर तरुणीची प्रकृती सुधारत होती, तिला रेमडेसीवीर इंजेक्शन आणि प्लाझ्मा उपचारही देण्यात आले होते. इतकेच नाही तर काही दिवसांत तिला डिस्चार्ज देण्याचाही डॉक्टर विचार करत होते, परंतु अचानक तिची तब्येत ढासळली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *