ताज्याघडामोडी

मंत्रालयासमोर विष पिऊन छावा संघटनेतील पदाधिकाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नी कोणतीही हालचाल न झाल्यामुळे अखेर आज जालना जिल्ह्यातील छावा संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या पाचही आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यानंतर सर्व आंदोलकांना मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या आंदोलकांनी पोलीस प्रशासन आपल्यावर दबाव आणत असल्याचा आरोप केला आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भीषण अपघात टेम्पो पलटून 16 जणांचा मृत्यू

जळगावात भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. किनगावजवळील मनूदेवी मंदिराच्या परिसरात टेम्पो पलटी होऊन हा भीषण अपघात झाला. यात आभोडा येथील 12 , केऱ्हाळा येथील 2 आणि रावेर येथील 2 असे 16 मजूर मृत्यूमुखी पडले आहेत तर 5 गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास किनगावजवळ आयशर टेम्पो पलटून हा अपघात झाला, ज्यात 16 जणांचा […]

ताज्याघडामोडी

काँग्रेस खासदाराची जीभ घसरली; नानांच्या सोहळ्यादरम्यान व्यासपीठावरुन वादग्रस्त शब्दाचा वापर

मुंबई, 12 फेब्रुवारी : आज नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची शपथ घेतली. या कार्यक्रमात मोठी गर्दी जमा झाली होती. त्यामुळे व्यासपीठावरुन अनेक पदाधिकाऱ्यांना खाली उतरवण्यात आलं. त्यामुळे नानांच्या कार्यक्रमात मानापमानाचं नाट्य रंगलेले पाहायला मिळालं. दरम्यान काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी या सोहळ्यात भाषण देताना चक्क शिवी दिल्याचं समोर आलं आहे. धोनोरकर यांनी व्यासपीठावर भाषण करताना पीएम […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

प्रेमप्रकरणातून एका युवकाची कोयत्याने वार करून हत्या

नवी मुंबईत प्रेमप्रकरणातून एका युवकाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. अनिकेत नामक मुलगा नवी मुंबईतील तळवली भागामध्ये राहत होता. या दरम्यान अनिकेतची एका मुलीशी ओळख झाली होती. त्यांच्यात बोलणं देखील सुरु झालं. मात्र मध्यंतरी कोरोना आला आणि अनिकेत आपल्या घरी नाशिकला राहायला गेला. या काळात अनिकेतच्या ओळखीच्या अनिल शिंदे याची त्याच मैत्रिणीशी ओळख […]

ताज्याघडामोडी

शनिवार-रविवारला जोडून पुन्हा बँक कर्मचारी दोन दिवस संपाच्या तयारीत 

खासगीकरणाच्या विरोधात सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे मार्चमध्ये बँका सलग चार दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडतेवेळी आणखी दोन सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली आहे. याविरोधात सरकारी बँकांच्या (PSBs) के कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी 15 आणि 16 मार्च या दोन दिवसांसाठी संपावर जाण्याचा निर्णय […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पुण्यात तरुणीची आत्महत्या 

हडपसर-महंमदवाडी येथे रविवारी रात्री एका सोसायटीच्या इमारतीवरुन पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने उडी मारुन आत्महत्या केली. राज्यातील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून या युवतीने आत्महत्या केल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. या गंभीर प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी,’ अशी मागणी भाजप पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष नगरसेविका अर्चना पाटील व भाजप युवा सरचिटणीस सुशील मेंगडे यांनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

देवकार्य करण्याचा बहाणा करून महिलेचा निर्घृण खून

देवकार्य करण्याचा बहाणा करत सोने लुटण्याच्या हेतून कोल्हापुरात 80 वर्षाच्या महिलेचा जाळून मृतदेह कापून निर्घुण खून केल्याची घटना आज सकाळी कोल्हापूरच्या राजराम तलाव परिसरात घडली होती. या खून प्रकरणाचा तापस आव्हानात्मक होता मात्र कोल्हापूर पोलिसांनी शिताफीने तपास करत छिन्न विच्छिन्न मृतदेहाची ओळख पटवली. शांताबाई शामराव आगळे या 80 वर्षीय मृत महिलेचं नाव असून या खून […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर तालुक्यात 1 हजार 309 नोंदीचे निर्गतीकरण- प्रांताधिकारी-सचिन ढोले

 पंढरपूर, दि. 09:-  फेरफार नोदींचा जलदगतीने निपटारा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचनेनुसार तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने विशेष अभियान राबविण्यात आले. यामध्ये तालुक्यातील नोंदणीकृत व अनोंदणीकृत 1 हजार 309 नोदींचे निर्गतीकरण करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.   जिल्ह्यासह तालुक्यातील प्रलंबित प्रकरणांची जलदगतीने निर्गती व्हावी यासाठी  दिनांक 1 ते 10  फेब्रुवारी […]

ताज्याघडामोडी

आता तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी होणार सरपंच सभा

ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविणे तसेच गावांमधील रखडलेली कामे जलदगतीने मार्गी लावण्याच्या अनुषंगाने आता राज्यात तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी सरपंच सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या सभा घेऊन सरपंचांकडून गावांमधील जनतेचे प्रश्न, समस्या ऐकून त्या मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. […]

ताज्याघडामोडी

सुजय विखे पाटील-रोहित पवार यांची छुपी युती

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा बँकेची येत्या 20 फेब्रुवारी रोजी निवडणूक आहे. मात्र त्यापूर्वीच जिल्हा बॅंकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीय कुरघोड्यांना उधाण आले आहे. जामखेड विविध सेवा मतदारसंघातून जगन्नाथ राळेभात यांची बिनविरोध निवड होणार आहे. राष्ट्रवादी आमदार रोहित पवार आणि भाजप खासदार सुजय विखे यांच्या छुप्या युतीमुळे जगन्नाथ राळेभात यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु […]