नागपूर, 05 मार्च : बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी नागपूरच्या मानकापूर पोलिसांनी महाराष्ट्र आईस हॉकी संघटनेच्या सचिवाला अटक केली. प्रशांत चव्हाण असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे, तो ठाणे शहर मुख्यालयात पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान प्रशांत चव्हाणनं नागपूर विभागात तीन जणांना आईस हॉकी राष्ट्रीय स्पर्धेचं बनावट क्रीडा प्रमाणपत्र दिलं असल्याचं […]
Tag: #MAHARASHTRA
आणखी एका राजकारण्याचे विवाहबाह्य संबध जाहीर करणार, प्रवीण दरेकरांचा गौप्यस्फोट
मुंबई : राज्य विधी मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे जोरदार मोर्चेबांधनी सुरू आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सत्ताधारी पक्षाच्या आणखी एका आमदारावर गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे, शिवसेनेचे मंत्री आणि आमदार संजय राठोड(sanjay rathod) यांच्या नंतर विरोधकांच्या निशाण्यावर […]
शिक्षिकेला कोरोना, 100 विद्यार्थी क्वारंटाईन
कोल्हापूर : कोरोनाच्या संकटामुळं अनेकठिकाणी शाळा-कॉलेज बंदच आहेत. जिथं शाळा-कॉलेज सुरू झाली तिथं कोरोनाचा संसर्ग वाढला. अशीच परिस्थिती असेल तर कोरोनाच्या संकटात दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशा होणार, असा सवाल आता उपस्थित होतो आहे. कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये लक्ष्मीबाई पाटील गर्ल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील एका शिक्षिकेला कोरोनाची लागण झाली. त्यामुळं ज्युनिअर कॉलेजातील 100 हून अधिक विद्यार्थी आणि […]
पूजा चव्हाण प्रकरणाला नवं वळण, वडिलांची चुलत आजीविरोधात तक्रार
बीड : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. पूजाचे वडील लहूदास चव्हाण यांनी शांताबाई राठोड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. परळी शहर पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पाच कोटी घेतल्याचा आरोप करून बदनामी केल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. संजय राठोड यांनी पूजा चव्हाणच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे […]
दहावी, बारावीच्या परीक्षा होणार नाहीत ?
मुंबई : राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, अशी शक्यता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या वक्तक्यामुळे वर्तवली जात आहे. कोरोनामुळे हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध भागांमध्ये शाळा सुरू केल्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्य सरकार आता खबरदारी म्हणून दहावी-बारावीची लेखी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्याच्या […]
अजित पवार यांची मोठी घोषणा वीज कनेक्शन तोडण्यास स्थगिती
करोना काळात पाठवण्यात आलेल्या वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावरून सभागृहात आज गोंधळ उडाला. विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावरून भाजपा आक्रमक झाली. सभागृहात गोंधळ सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत वीज तोडणी मोहिमेला स्थगिती देत असल्याची […]
लॉकडाऊनच्या दिशेने पुढचे पाऊल,उपमुख्यमंत्री अजित पवारांचा महत्वपूर्ण आदेश
शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच जात आहे.बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे मागील सात दिवसांत सक्रीय बाधितांच्या संख्येत तब्बल एक हजाराने वाढ झाली आहे. या सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आज पुण्यात कोरोना नियंत्रण आढावा बैठक घेण्यात आली. दरम्यान, या बैठकीत पुण्यातील २८ तारखेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उप मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार […]
मंत्रालयासमोर विष पिऊन छावा संघटनेतील पदाधिकाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नी कोणतीही हालचाल न झाल्यामुळे अखेर आज जालना जिल्ह्यातील छावा संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या पाचही आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यानंतर सर्व आंदोलकांना मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या आंदोलकांनी पोलीस प्रशासन आपल्यावर दबाव आणत असल्याचा आरोप केला आहे. […]
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन खा.उदयनराजे यांनी दिले तीन पानी पत्र
आदरणीय साहेब… Sharad Pawar तुम्हाला माहीतच आहे कि मराठा समाज हा आरक्षणासाठी वर्षानुवर्षे खूप मोठा संघर्ष करत आहे. तरीही त्याच्या पदरात आजपर्यंत काहीच पडले नाही. यापेक्षा मला खूप दुःख होतं की मराठा समाजातल्या ४० हून अधिक मराठा बांधवानी आत्महत्या केली. मराठा समाजाची आरक्षणाची वैध मागणी लक्षात घेवून राज्य शासनाने न्या. गायकवाड आयोगाची स्थापना केली. या […]
ग्राहक बनून आला अन् सोन्याचा बॉक्स घेऊन पसार झाला…
मुंबई: कांदीवली परिसरातील एका सराफाच्या दुकानात चोरीची घटना घडली आहे. एक व्यक्ती सराफाच्या दुकानात ग्राहक बनून आला आणि सोन्याचा बॉक्स घेऊन फरार झाल्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणी कांदीवलीतील चारकोप पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस या चोराचा तपास घेत आहेत. कांदीवलीच्या चारकोप परिसरातील भारत भूषण इमारतीतील पद्मावती ज्वेलर्समध्ये एक व्यक्ती ग्राहक बनून आला. […]