मुंबई : राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, अशी शक्यता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या वक्तक्यामुळे वर्तवली जात आहे. कोरोनामुळे हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध भागांमध्ये शाळा सुरू केल्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्य सरकार आता खबरदारी म्हणून दहावी-बारावीची लेखी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे तामिळनाडू राज्यात दहावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही असा निर्णय घेतला जाऊ शकतो. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलंय.
Related Articles
चिमुरडी घरातच असुरक्षित! नराधम बापानेच केलं संतापजनक कृत्य; नात्याला काळीमा फासणारी घटना
महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत चालली आहे. विकृत मानसिकता असलेल्यांकडून अशा प्रकारच्या घटना घडताना दिसतात. असाच एक धक्कादायक प्रकार सेवाग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. एका नराधम बापाने स्वत:च्याच अवघ्या ११ वर्षीय मुलीशी लैंगिक चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला. ही बाब ऐकून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी नराधम बापास अटक […]
जोडप्याचं टोकाचं पाऊल, दीड वर्षांचा चिमुकला दोन दिवस शेजारीच बसून; तिसरा दिवस उजाडला अन्..
मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये दीड वर्षांचा मुलगी तीन दिवस त्याच्या आई वडिलांच्या मृतदेहांसोबत बंद घरात राहत होता. तहान भुकेनं व्याकूळ झालेला चिमुरडा बेशुद्ध पडला. त्यामुळे त्याच्या रडण्याचा आवाजदेखील शेजाऱ्यांना ऐकू गेला नाही. मृतदेह कुजू लागल्यानं दुर्गंधी पसरु लागली. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं. त्यांनी दार तोडलं. तेव्हा आत जोडप्याचे मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत दिसले आणि निष्पाप चिमुकला […]
“जियो और जीने दो” या देशातील पहिल्या हिंदी फिचर फिल्मला 11 वर्षे पूर्ण
गोहत्येच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या मार्मिक गाण्यांनी सुसज्ज असलेल्या “जियो और जीने दो” या देशातील पहिल्या हिंदी फिचर फिल्मला 11 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, निर्माते कै.श्री अशोक जी लुनिया यांच्या स्मरणार्थ सहनिर्माते विनायक अशोक लुनिया यांच्या अंबाजी म्युझिक प्रॉडक्शन कोलकाता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे की, आम्ही मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम […]