नवी मुंबईत प्रेमप्रकरणातून एका युवकाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. अनिकेत नामक मुलगा नवी मुंबईतील तळवली भागामध्ये राहत होता. या दरम्यान अनिकेतची एका मुलीशी ओळख झाली होती. त्यांच्यात बोलणं देखील सुरु झालं. मात्र मध्यंतरी कोरोना आला आणि अनिकेत आपल्या घरी नाशिकला राहायला गेला. या काळात अनिकेतच्या ओळखीच्या अनिल शिंदे याची त्याच मैत्रिणीशी ओळख […]
Tag: #police
आर्थिक फसवणूक झाल्याने सराफाची आत्महत्या
सांगलीत सराफाने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे आणि सोन्याच्या देवाण-घेवाणीतून सराफाची फसवणूक झाली. त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे, पैसे आणि सोन्याच्या देवाण-घेवाणीतून सराफ हरीशचंद्र खेडेकर यांची फसवणूक करण्यात आली. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर सराफ हरीशचंद्र खेडेकर (वय 82) यांनी […]
”त्या” महाराजाच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना,७२ तास उलटूनही महाराज बेपत्ताच
विनयभंगाचा आरोप फेटाळून लावत व्हिडिओद्वारे तसेच सुसाईट नोटमधून थेट आत्महत्येचा इशारा देणारे सूर्यमंदिर संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज हाडुळे (२०) हे गेल्या चार दिवसापासून बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे विशेष पथक शोध घेत असून तरीही त्यांचा शोध लागत नसल्याने विनयभंग प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. गेवराई तालुक्यातील सूर्यमंदिर संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज हाडुळे हे विनयभंग, बाललैंगिक […]
देवकार्य करण्याचा बहाणा करून महिलेचा निर्घृण खून
देवकार्य करण्याचा बहाणा करत सोने लुटण्याच्या हेतून कोल्हापुरात 80 वर्षाच्या महिलेचा जाळून मृतदेह कापून निर्घुण खून केल्याची घटना आज सकाळी कोल्हापूरच्या राजराम तलाव परिसरात घडली होती. या खून प्रकरणाचा तापस आव्हानात्मक होता मात्र कोल्हापूर पोलिसांनी शिताफीने तपास करत छिन्न विच्छिन्न मृतदेहाची ओळख पटवली. शांताबाई शामराव आगळे या 80 वर्षीय मृत महिलेचं नाव असून या खून […]
सोशल मीडियावर ओळख, निवृत्त शिक्षिकेची १३ लाखांची फसवणूक
पुणे: फेसबुकवर ओळख झालेल्या व्यक्तीने एका निवृत्त शिक्षिकेची १३ लाख १७ हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ६१ वर्षीय महिलेने मुंढवा पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार तिघांच्या विरोधात फसवणूक व आयटी अक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी ते जून २०२० दरम्यान […]
पोलीस हवालदार इकबाल शेख यांना मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे हस्ते मुंबई येथे राष्ट्रीय पारितोषिक प्रदान
पोलीस हवालदार इकबाल अब्दुल रशीद शेख सोलापूर ग्रामीण यांनी गुन्हे अभिलेख केंद्र नवी दिल्ली यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या सीसीटीएनएस व आयसीजेएस या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेवून वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी करून राष्ट्रीय पारितोषिक मिळविले आहे त्याबद्दल दिनांक 04 फेब्रुवारी 2021 रोजी पोलीस महासंचालक कार्यालय, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे मा. हेमंत नागराळे, नूतन पोलीस महासंचालक, […]
मुलगा हवा यासाठी पत्नीला डांबून मारहाण
बीड : खळबळजनक बातमी बीडमधून. मुलगा व्हावा म्हणून पतीने पत्नीला बेदमपणे मारहाण करत रात्रभर बांधून ठेवले. त्यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला. मुलाच्या हव्यासापोटी स्वत:च्या पत्नीला डांबूने रात्रभर बेदम मारहाण केल्याने अती रक्तस्त्राव होवून पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगपूर शिवारात घडली. या घटनेने संताप व्यक्त होत आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या पत्नीला आता मुल होणार नाही. […]
नवीपेठ खून प्रकरणीपुणे मोक्का न्यायालयाने गॅंग लीडरसह २२ जणांची केली निर्दोष मुक्तता
पुणे शहरातील घायवळ आणि मारणे गॅंगचे वैमनस्य हा केवळ पुणे शहरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय असून घायवळ टोळीतील अमोल बधे याची २९ नोव्हेंबर २०१४ रोजी नवीपेठेत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.या प्रकरणी मारणे गँगचा लीडर गजानन मारणे याच्यासह २२ आरोपी विरोधात मोक्का न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर विशेष मोका न्यायाधीश एम.वाय.थत्ते यांनी सर्व […]
महिला विहिरीत पडल्याची माहिती देणारा व्यक्तीच निघाला आरोपी
बुलडाणा : महिला विहिरीत पडल्याची माहिती देणारा व्यक्तीच पोलिसाच्या प्राथमिक तपासात आरोपी निघाला असून पोलीसांनी त्याला अटक केले आहे. ही घटना बुलढाणा शहरातील असून सुरेश पवार या इसमाने बेबाबाई बावणे ही महिला विहिरीमध्ये पडल्याची माहिती नातेवाईकांना दिली. त्यांनतर पोलीस श्वानपथक सह घटनास्थळी विहिरीजवळ दाखल झाले आणि शोध घेतला असता प्राथमिक तपासात सुरेश पवार हा आरोपी […]
पोलीस शिपायाला १७ लाखांचा गंडा
मुंबई : स्वस्तात घर विकत घेण्याचे प्रलोभन दाखवून एका पोलीस शिपायाला १७ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. दिंडोशी येथील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पांतर्गत उभारलेल्या इमारतीत दोन सदनिका प्रत्येकी दहा लाख रुपयांना खरेदी करण्याच्या मोहापोटी पैसे भरणाऱ्या या शिपायाला अशी कोणतीही इमारतच नसल्याचे समजल्यावर ही फसवणूक लक्षात आली. कुर्ला परिसरात वास्तव्यास असलेल्या आणि […]