महावितरणच्या कनिष्ठ अभियंता वाघमारे आणि काथवटे यांनी हलगर्जीपणामुळे पंढरपूर तालुक्यातील अजनसोड येथील शेतकरी उत्तम शंकर घाडगे वय 60 वर्ष यांच्या एकुलत्या एक मुलास विजेचा धक्का बसून आपला जीव गमवावा लागला आहे.या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.सदर प्रकरणी महावितरणच्या दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी फिर्यादी उत्तम शंकर घाडगे यांनी पंढरपुरातील […]
Tag: #police
आईला मारहाण करणाऱ्या मुलाचा खून
भंडारा .भाजी चांगली बनविली नाही’, असे म्हणून आईला शिवीगाळ करीत मारहाण करणाऱ्या मुलाचा वडिलांसह दोन भावंडांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. त्यानंतर भीतीपोटी त्याचा मृतदेह जंगलात पुरला. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेचे बिंग १५ मार्च रोजी उघडकीस आले. याप्रकरणी वडील आणि दोन भावंडांविरुद्ध साकोली पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. ही घटना १९ फेब्रुवारी रोजी साकोली तालुक्यातील तुडमापुरी […]
मांसाहारी जेवण नाही दिले म्हणून PI ने डबेवाल्यास केली बेदम मारहाण
सोलापूर जेवणाच्या डब्यात मांसाहारी जेवण का आणले नाही? असा जाब विचारत पोलीस निरीक्षकाने डबेवाल्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी (दि. 8) रात्री पावणे दहाच्या सुमारास सोलापूरात ही घटना घडली. याप्रकरणी डब्बेवाल्याच्या तक्रारीवरून पोलीस आयुक्तांनी चौकशी सुरु केली आहे. विजय रावसाहेब घोलप (रा. बापूजी नगर महिला आश्रमसमोर, सोलापूर ) असे मारहाण झालेल्याचे नाव […]
धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करणं आलं पोलिसांच्या अंगलट
सोलापूर | पोलिस कर्मचार्याचा वाढदिवस साजरा करणं वेळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाच्या चांगलचं आंगलट आलयं. जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव व पोलिस कर्मचारी विनोद साठे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. गेल्या आठवड्यात पोलिस कर्मचारी विनोद साठे यांचा वेळापूर चौकात धुमधड्याक्यात वाढदिवस साजरा केला होता. यावेळी सोशल डिस्टन्सींग फज्जा उडाला होता. […]
पाठलागानंतर कुख्यात गुंड गजा मारणे पोलिसांना शरण
कुडाळमार्गे येणाऱ्या भरधाव कारचा मेढा पोलिसांनी थरारक पाठलाग करत पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासह चौघांना शनिवारी अटक केली. मेढ्याच्या बाजार चौकात पोलिसांनी भरधाव कारला पोलिस गाडी आडवी लावल्यावर सर्च आँपरेशन सुरू केले. कारमधील एकाने डोक्यावरील टोपी काढून मीच गजानन मारणे आहे, असे सांगितले. पोलिसांनी चौकातच चौघांची ओळखपरेड घेतल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. […]
पंढरपुरात अवैध सावकारी प्रकरणी शहर पोलीस आणि सह.निबंधक कार्यालयाची संयुक्त कारवाई
भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विदुल अधटराव याच्या विरोधात कर्जदाराकडून दाखल तक्रारीची दखल घेत पंढरपूर शहर पोलीस ठाणे आणि सह.निबंधक सहकारी संस्था पंढरपूर यांच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई केली असून या कारवाईत स्टॅम्प,४८ चेक तसेच मोठ्या प्रमाणात सावकारी येण्या -देण्याचा हिशोब असलेले कागदपत्रे प्रदीप भानुदास सावंत (सहकार अधिकारी श्रेणी १ ) यांच्या उपस्थितीत ताब्यात घेण्यात आल्याची […]
माझे पती आत्महत्या करूच शकत नाही; मृत्यूची सखोल चौकशी व्हावी
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलीया निवासस्थानासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत आज आढळून आला. याप्रकरणी मनसुख यांची पत्नी विमल यांनी मी आणि माझा परिवार असा याबाबत विचार करू शकत नाही. आठ दिवसांपूर्वी गाडी हरवली होती. पोलिसांना माझे पती पूर्ण सहकार्य करत होते असे सांगितले. मात्र माझ्या […]
धक्कादायक, पोलीस कर्मचारीच निघाला बनावट क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यातला आरोपी!
नागपूर, 05 मार्च : बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी नागपूरच्या मानकापूर पोलिसांनी महाराष्ट्र आईस हॉकी संघटनेच्या सचिवाला अटक केली. प्रशांत चव्हाण असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे, तो ठाणे शहर मुख्यालयात पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान प्रशांत चव्हाणनं नागपूर विभागात तीन जणांना आईस हॉकी राष्ट्रीय स्पर्धेचं बनावट क्रीडा प्रमाणपत्र दिलं असल्याचं […]
सरकोली येथे अवैध वाळू उपशावर पुन्हा तालुका पोलिसांची कारवाई
पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे काल तालुका पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली असून या कारवाईत भीमा नदीच्या पात्रातून थेट जेसीबीच्या साहाय्याने वाळू उपसा केला जात असल्याचे उघड झाले आहे.गेल्या काही महिन्यात सरकोली परिसरातील भीमा नदीकाठच्या भागातून सातत्याने वाळू चोरीच्या घटना पोलीस कारवायांतून उघड होत असतानाच वाळू चोरी मात्र थांबत नसल्याचे दिसून येत आहे. रविवार दिनांक २८ […]
नवरदेवांचे स्वप्नभंग करणाऱ्या टोळीला बेड्या
पुणे गुन्हे शाखेने खोटे लग्न करुन कुटुंबांना लुटणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीतील 9 महिला आणि 2 पुरुषांना अटक केले असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या टोळीने आतापर्यंत 50 पेक्षा जास्त कुटुंबांना लुटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही खोटे लग्न करणारी टोळी महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकात सक्रिय होती. यातील महिलांनी आतापर्यंत 50 […]