गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पाठलागानंतर कुख्यात गुंड गजा मारणे पोलिसांना शरण

कुडाळमार्गे येणाऱ्या भरधाव कारचा मेढा पोलिसांनी थरारक पाठलाग करत पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासह चौघांना शनिवारी अटक केली.

मेढ्याच्या बाजार चौकात पोलिसांनी भरधाव कारला पोलिस गाडी आडवी लावल्यावर सर्च आँपरेशन सुरू केले. कारमधील एकाने डोक्यावरील टोपी काढून मीच गजानन मारणे आहे, असे सांगितले. पोलिसांनी चौकातच चौघांची ओळखपरेड घेतल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. पुणे ग्रामीण पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पकडले आहे. मारणे याच्यावर एमपीडीएनुसार कारवाई करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्याला येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *