अमरावती : बांधकामासाठी लागणार्या वाळुवरुन सुरु असलेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाची तिघांनी निर्घुण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. वैभव भीमराव तायडे (वय २२, रा. चवरेनगर, अमरावती) असे हत्या झालेल्या तरुणांचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दीपक तुरट (वय २५), संकेत घुगे (वय २५), शुभम कुकडे (वय २६, रा. अमरावती) यांना अटक केली आहे. ही घटना […]
Tag: #police
‘सामान्य’ पंढरपुरकरात प्रचंड दरारा असलेल्या पोलीस अधिकाऱ्यास लाचखोरीच्या प्रकरणात अटक
भूवैकुंठ समजल्या जणाऱ्या पंढरपूरला जशी भक्तीची परंपरा आहे तसाच संघटीत गुंडगीरी आणि अवैध व्यवसायिकांच्या दहशतीचाही डाग आहे.आपले अवैध धंदे सुरळीत सुरु रहावेत म्हणून राजकीय वस्त्राची झूल पांघरत प्रतिष्ठा प्राप्त करणाऱ्यांची जशी इथे कमी नाही तशीच एखादा अतिशय कर्तव्यकठोर अधिकारी जर या शहरास लाभला तर त्याला देवत्व बहाल करण्यातही येथील जनतेने कधी कसूर ठेवली नाही.तात्कालीन पोलीस […]
लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर नागरिकांची झुंबड; पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
बीड, 28 एप्रिल: बीड जिल्ह्यात कोरोनाचा समुह संसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी आता जिल्ह्यातील नागरिक लस घेण्यासाठी धावपळ करू लागले आहेत. मात्र लसीचा तुटवडा असल्याने आज जिल्ह्यात केवळ तीन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु होते अन्य 127 लसीकरण केंद्र लसी अभावी बंद करावे लागले. आज सकाळी आरोग्य विभागाकडे केवळ 2600 लसींचे डोस उपलब्ध होते. दुपारपर्यंत […]
राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावे मागितला १० लाखांचा हप्ता!
अकोला ः येथील प्रसिद्ध विजय ट्रान्सपोर्टच्या मालकाला गृहमंत्र्यांच्या नावाने दहा लाखांचा हप्ता मागितल्याची तक्रार पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून ते १३ जणांकडे करण्यात आली आहे. यात हप्तासाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देवून आठ तास स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात डांबून ठेवल्याचा आरोप ट्रान्सपोर्ट संचालकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध केला आहे. अकोला येथील वाशीम बायपास रोडवरील गंगानगर येथे विजय ट्रान्सपोर्टचे […]
१० लाखांसाठी पोलिसाकडून पत्नीचा छळ ; ५ जणांविरुद्ध गुन्हा
जळगाव शहरातील शंकर आप्पा नगरात राहणाऱ्या विवाहितेने मुंबई येथे घर घेण्यासाठी माहेरून १० लाख रुपये आणावेत यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पोलीस पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामानंद नगर परिसरात असलेल्या शंकर आप्पा नगरातील ३० वर्षीय विवाहिता अश्विनी पाटील यांचा विवाह २०१० मध्ये झाला होता. त्यांचे […]
गृहमंत्र्यांच्या नावाने पाच लाखांची मागणी करणाऱ्या पीआयची चौकशी
पुणे:कारवाई टाळण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे पोलिस निरिक्षक संतोष गिरीगोसावी यांची चौकशी उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांनी सुरु केली आहे. बारामतीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या संदर्भतील चौकशी निपक्षपातीपणे व्हावी या साठी विशेष पोलिस महानिरिक्षकांनी मिलिंद मोहिते यांना बार्शी येथे पाठवले होते. त्या संदर्भात […]
पोलिस असल्याची बतावणी करत दागिने केले लंपास
सांगली येथील एका अज्ञाताने पोलीस असल्याचे बतावणी करून आप्पासाहेब पाटीलनगरमधील महिलेचे २ तोळ्यांचे दागिने लंपास केले आहे. हि घटना शनिवारी घडली आहे. मंगल दिलीप नाईक (वय ५८, रा. आप्पासाहेब पाटीलनगर, सांगली ) या महिलेने या प्रकरणावरुन सांगली शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. यावरून शहर पोलिसांकडून त्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार, […]
2 लाखांच्या बदल्यात 14 लाखांची मागणी करणाऱ्या खाजगी सावकारांना अटक
दहा टक्के व्याज दराने कर्ज देऊन दोन लाखांच्या बदल्यात 14 लाख रुपयांची मागणी करू त्रास देणाऱ्या दोघा खाजगी सावकारांना पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. उमेश चंद्रकांत घारे ( राहणार सन सिटी सिंहगड रस्ता पुणे) आणि संदीप घारे (वारजे माळवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या खाजगी सावकारांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल […]
अबब !700 कोटीची करचोरी
आयकर विभागाने धाड टाकून केलेल्या कारवाईत ७०० कोटींची करचोरी समोर आली असल्याचा दावा केला आहे. आयकर विभागाकडून हैदराबादमधील दोन रिअल इस्टेट डेव्हलपर्सवर धाड टाकत कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान ११ कोटी ८८ लाखांची रोख रक्कम तसंच १ कोटी ९३ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) दिली आहे. कारवाई करण्यात […]
खोकल्याचं औषध समजून विष प्राशन केल
बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनमधील एका पोलीस कर्मचाऱ्याने खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्राशन केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोपट दराडे असं मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असणारे पोपट दराडे वय 45, हे आपले ड्युटी बजावून घरी आराम करीत होते. त्यांना दोन-तीन दिवस खोकला येत होता. रात्री त्यांनी खोकल्याचे औषध […]