ताज्याघडामोडी

खोकल्याचं औषध समजून विष प्राशन केल

बारामती ग्रामीण पोलीस  स्टेशनमधील एका पोलीस कर्मचाऱ्याने खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्राशन केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोपट दराडे असं मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.

ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असणारे पोपट दराडे वय 45, हे आपले ड्युटी बजावून घरी आराम करीत होते. त्यांना दोन-तीन दिवस खोकला येत होता. रात्री त्यांनी खोकल्याचे औषध समजून शेतावर फवारणीचे (टू फोर्टी) औषध प्राशन केले. दराडे यांना थोड्या वेळानंतर त्रास व्हायला लागल्यानंतर त्यांनी घरच्यांना, मी हे औषध प्यायलो आहे,असे सांगितलं. त्यानंतर कुटुंबातील लोकांनी त्यांना लगोलग उपचारासाठी रुग्णालयात दाखलं केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *