नवी दिल्ली : लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा अपॉईंटमेंट बंधनकारक नाही. लाभार्थ्यांना थेट लसीकरण केंद्रावर जाऊन तिथेच नोंदणी करुन लस घेता येईल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. ग्रामीण भागांमध्ये लोकांना लस घेण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं आहे. यासंदर्भात सरकारनं म्हटलं की, “ज्या व्यक्तीचं वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा […]
Tag: #vaccine
कोरोनाविरोधात अमेरिकेची नोव्हाव्हॅक्स रणांगणात, 90 टक्के प्रभावी
अमेरिकेच्या नोव्हावॅक्स फार्मा कंपनीने अत्यंत प्रभावी नोव्हाव्हॅक्स लसीच्या उत्पादनाची घोषणा आज केली. ही लस गंभीर रुग्णांवरही 90 टक्के प्रभावी असून कोरोनाच्या विविध व्हेरिएंट्सवरला रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हिंदुस्थानात या लसीचे उत्पादन सिरम इन्स्टिटय़ूट करणार आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी हिंदुस्थानात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनबरोबर आणखी एक लस उपलब्ध होणार आहे. अमेरिकेच्या नोव्हावॅक्स या […]
कोव्हिशिल्डचा डोस घेतल्यानंतर ४५७ जणांचा, तर कोव्हॅक्सिनचा डोस घेणाऱ्या २० जणांचा मृत्यू
नवी दिल्ली – देशावर ओढावलेल्या कोरोना संकटाविरोधात लढण्यासाठी सध्या देशभरामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. याचदरम्यान सीएनएन न्यूज १८ ने सरकारी माहितीच्या आधारे दिलेल्या आकडेवारीनुसार लसीकरणामुळे आतापर्यंत देशात ४८८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २६ हजार जणांना लस घेतल्यानंतर गंभीर स्वरुपाचे साईड इफेक्ट दिसून आले आहेत. अशा गंभीर स्वरुपाच्या साईड इफेक्ट्सला वैज्ञानिक […]
सीरम इन्स्टिट्युटचे अदर पूनावाला, WHO सह अनेकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
लखनौ : कोविशील्ड लस मिळाल्यानंतरही अँटीबॉडीज तयार न झाल्याबद्दल मानवाधिकार कार्यकर्ते प्रताप चंद्र यांनी शनिवारी एसीजेएम -5 दंडाधिकारी शांतनु त्यागी यांच्या न्यायालयात 156-3 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मालक अदर पूनावाला, ड्रग कन्ट्रोल डायरेक्टर, ICMR, आरोग्य सचिव आणि WHO विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रताप चंद्राने 30 मे रोजी अशियाना पोलिस […]
लसीकरणातील अंतर वाढवणे धोकादायक, अँथनी फाउची यांचा इशारा
लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढविल्याने कोव्हिडच्या विषाणूंची बाधा होण्याची शक्यता वाढत असल्याचा इशारा अमेरिकेच्या अध्यक्षांचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाउची यांनी दिला आहे. एनडीटीव्ही या वाहिनीशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. केंद्र सरकारने गेल्या महिन्यांत दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांपर्यंत वाढविले आहे. त्यावर फाउची बोलत होते. ते म्हणाले, ‘मॉडर्नाच्या दोन डोसमधील अंतर चार आठवडे आणि फायझरच्या दोन डोसमधील […]
धक्कादायक! गप्पा मारण्याच्या नादात नर्सने एकाच व्यक्तीला दिले करोनाचे दोन्ही डोस
नवी दिल्ली : देशात एकीकडे लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहीम थांबवण्यात येत आहे. तर आता दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील ललितपुर जिल्ह्यामध्ये करोना लसीकरण केंद्रावर एक विचित्र घटना घडली आहे. एका व्यक्तीला पाच मिनिटांच्या अंतराने करोनाचा दोन लसी देण्यात आल्या आहेत. ही घटना रावरपुर परिसरामधील एका लसीकरण केंद्रावर घडली आहे. बुधवारी रावरपुर परिसरामधील एका लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेलेल्या […]
कोव्हॅक्सिन की कोविशिल्ड? कुठल्या लसीमुळे तयार होतात जास्त अँटिबॉडीज?
मुंबई : आजवर 22 कोटी जनतेचं देशभरात लसीकरण झालंय. पण लस कुठली घ्यावी, याबद्दल अजूनही तुमचा निर्णय झाला नसेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची आहे.. कुठल्या लसीमुळे जास्त आणि लवकर अँटिबॉडीज तयार होतात, याबद्दल नुकतंच एक संशोधन झालंय. पाहुया त्याचं उत्तर काय आहे. जगात सगळ्यात लसींसंदर्भात अभ्यास सुरू आहे. भारतातली कुठली लस जास्त प्रभावी यासंदर्भात तज्ज्ञांनी काही […]
कोरोनाची लस घेतलेल्या एकाही कोरोना बधिताचा मृत्यू नाही
कोरोना लसीचा डोस घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.एम्सच्या टीमने एप्रिल आणि मे महिन्यात केलेल्या पाहणीत हे निष्कर्ष पुढे आले आहेत.या काळात कोरोनाची दुसरी लाट शिखरावर होती आणि दररोज जवळपास 4लाख नवे रुग्ण समोर येत होते. एम्सच्या स्टडीनुसार, ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले, त्यांना कोरोनाची लागण झाली मात्र कोरोनामुळे अशा लोकांना मृत्यू […]
कोरोनाची लस तुम्हाला किती दिवस सुरक्षित ठेवेल? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ
नवी दिल्ली, 1 जून: भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यात येत आहे. आतापर्यंत देशात 21.58 कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण झालंय. देशात सध्या तीन लसींच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे. सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुटनिक. या सर्वच लसींचे दोन डोस दिले जातात. कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसदरम्यान 12-16 आठवड्यांचं अंतर ठेवण्यात […]
आता दररोज 1 कोटी लोकांना दिली जाईल कोरोनाची व्हॅक्सीन ! सरकार तयार करतंय नवीन योजना
नवी दिल्ली : देशात सध्या कोरोना महामारी सुरू आहे. अनेक राज्यात व्हॅक्सीनची टंचाई पाहता 18-44 वयाच्या लोकांना लस देण्याची केंद्र सध्या बंद करण्यात आली आहेत. या दरम्यान वृत्त आहे की, केंद्र सरकार आता दररोज एक कोटी लोकांना व्हॅक्सीन देण्याची योजना बनवत आहे. सूत्रांनुसार जुलैच्या दुसर्या किंवा तिसर्या आठवड्यापासून हे शक्य आहे. सध्या ही योजना अंमलात […]