ताज्याघडामोडी

कोरोनाविरोधात अमेरिकेची नोव्हाव्हॅक्स रणांगणात, 90 टक्के प्रभावी

अमेरिकेच्या नोव्हावॅक्स फार्मा कंपनीने अत्यंत प्रभावी नोव्हाव्हॅक्स लसीच्या उत्पादनाची घोषणा आज केली. ही लस गंभीर रुग्णांवरही 90 टक्के प्रभावी असून कोरोनाच्या विविध व्हेरिएंट्सवरला रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हिंदुस्थानात या लसीचे उत्पादन सिरम इन्स्टिटय़ूट करणार आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी हिंदुस्थानात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनबरोबर आणखी एक लस उपलब्ध होणार आहे.

अमेरिकेच्या नोव्हावॅक्स या लसीची 29 हजार 960 लोकांवर चाचणी करण्यात आली. त्यात तिसऱया मानवी चाचणीत खूपच सकारात्मक असे परिणाम आढळले. अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये या लसीची चाचणी घेण्यात आली.

कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंट्सपासून ही लस सुरक्षा देते, सर्वात जास्त प्रभावी आहे. ही लस 90.4 टक्के प्रभावी असून मध्यम आणि तीव्र आजारापासून संरक्षण देण्यात 100 टक्के खात्रीदायक असल्याचा दावा पंपनीने केला आहे. लसीचे बहुतेक डोस मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये जातील, असे नोव्हाव्हॅक्सचे चीफ एक्झिक्युटिव्ह स्टॅनले इरेक यांनी म्हटले आहे.

महिन्याला 100 दशलक्ष डोसचे उत्पादन करणार

नोव्हाव्हॅक्स लसीचा साठा आणि वाहतूकही सोपी आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत यूएस, युरोप आणि जगभरातील इतर देशांकडून कंपनी लसीसाठी परवानगी मागणार आहे. त्यानंतर महिन्याला या लसीचे 100 दशलक्ष डोसचे उत्पादन केले जाणार आहे. दरम्यान, हिंदुस्थान 2121 च्या अखेरपर्यंत या लसीचे 20 कोटी डोस आयात करणार आहे.

रक्तदान श्रेष्ठदान…

हिंदुस्थानसह जगभरात सोमवारी ‘जागतिक रक्तदान दिन’ मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. अनेकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करीत या दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील सरकारी रुग्णालयात या दिनाचे औचित्य साधून रक्तदान करून जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची गरज असल्याबाबतची जनजागृती करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *