महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दोन दिवसांपासून तुफान वेगाने कोसळणारा पाऊस पुढचे दोन दिवस देखील असाच किंबहुना अतिमुसळधार कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, गोवा आणि किनारपट्टीला लागून असलेल्या पश्चिम घाट, तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये २३ जुलै आणि २४ जुलै या दोन दिवसांमध्ये अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाकडून […]
Tag: #rain
भीमा नदी काठांवरील गावांनी सतर्क रहावे
भीमा-निरा खोऱ्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे निरेवरील धरणातून पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. तसेच उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरु असल्याने भीमा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याने भीमा व नीरा नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे,असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने तसेच पूर परिस्थितीमुळे तालुक्यातील शेत पिकांची व सार्वजनीक मालमत्तेचे […]
पुढील 5 दिवस महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’
मागील तीन-चार दिवसांत पावसाने राज्यातील विविध भागात दमदार हजेरी लावली आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट आज आणि उद्या पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा […]
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट
मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई आणि ठाण्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच पावसाचा जोर पाहिला मिळतोय. राज्यात सर्वदूर पाऊस राज्यात सर्वदूर मान्सूनची बरसात होतेय. विदर्भातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यात काल संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. […]
सोलापूरसह उस्मानाबाद, जालना, लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : मान्सूनच्या पहिल्याच दिवशी पावसाने मुंबईला चांगलंच झोडपलं. अशातच 13 आणि 14 जूनला मुंबईत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवस कोकणात अतितीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम […]
महाराष्ट्रात पुढचे 4 दिवस अतिवृष्टी, हवामान विभागाचा इशारा
मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस बरसत आहे. मुंबई उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर या भागात सकाळपासून धुवाँधार पाऊस बरसत आहे. ढगाळ वातावरण आणि बरसणाऱ्या पावसाने परिसरात काळोख दाटला आहे. राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर आता तो जोर पकडणार असल्याचं चिन्हं आहे. दरम्यान, महाराष्ट्रात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच 11 आणि […]
पुढचे चार दिवस महत्त्वाचे
मुंबई : एकीकडे उन्हाच्या झळा वाढत असताना आगामी चार दिवस म्हणजेच 29 एप्रिलपर्यंत मध्य भारतासह महाराष्ट्रात मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यापूर्वी 11 एप्रिल रोजी राज्यात कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, परभणी या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडला होता. त्यानंतर आता पुन्हा आगामी 5 दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता […]
राज्यातील ‘या’ भागात पुढील चार दिवस पावसाची शक्यता!
मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात 24 एप्रिल रोजी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे शहरात सध्या उन्हाचा कडाका कमी झाला असला तरी रात्रीच्या तापमानात वाढ झाली आहे. दरम्यान, यंदा पाऊस समाधानकारक होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार आहेत. येणारा पावसाळा देशभरात समाधानकारक असेल, असा अंदाज […]