ताज्याघडामोडी

राज्यातील ‘या’ भागात पुढील चार दिवस पावसाची शक्यता!

मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात 24 एप्रिल रोजी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे शहरात सध्या उन्हाचा कडाका कमी झाला असला तरी रात्रीच्या तापमानात वाढ झाली आहे.

दरम्यान, यंदा पाऊस समाधानकारक होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार आहेत. येणारा पावसाळा देशभरात समाधानकारक असेल, असा अंदाज ‘स्कायमेट वेदर’ या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने वर्तवला आहे. राज्यात यंदा 103% पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात 5% चा फरक पडू शकतो. त्यानुसार 98% ते 107% यादरम्यान पाऊस पडेल. त्यामुळे यावर्षी देखील सरासरी इतकाच पाऊस पडेल, अशी माहिती स्कायमेट वेदरने ऑनलाईनने पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *