ताज्याघडामोडी

पंढरपूरातही होणार कोरोना रुग्णांना आकारण्यात आलेल्या बिलांची पडताळणी

कोरोना रुग्णांवर ज्या खासगी रुग्णालयांत उपचार होत आहे अशा काही रुग्णांलयांनी शासनाने निर्देशित केलेल्या दरापेक्षा अधिक दर लावून बिलाची आकारणी केल्यास सदर बिलांची पडताळणी करण्यात येणार असून यासाठी प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याशी संपर्क केला असता कोविड हॉस्पिटल कडून कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आकारण्यात येणाऱ्या बिलांची पडताळणी करण्यासाठी संजय सदावर्ते यांच्यासह ५ जणांची विशेष समिती स्थापित केल्याचे सांगितले.  […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

डॉक्टरी पेशाला काळीमा, कोविड सेंटरमध्ये शरीरसुखाची मागणी करणारा डॉक्टर गजाआड

नागपूर, 28 एप्रिल : कोरोनाच्या संकटात डॉक्टर जिवाची बाजी लावून रुग्णांची सेवा करत आहे. पण नागपुरात डॉक्टरीपेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. कोविड सेंटरमध्ये एका डॉक्टराने सहकारी महिला डॉक्टरावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. डॉ. नंदू रहांगडाले असं या डॉक्टराचं […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कोरोनामुळे भाजप नगरसेविकेच्या भावाचे निधन, बहिणीने हॉस्पिटलमध्ये केली तोडफोड!

नाशिक, 27 एप्रिल : नाशिकमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. सर्वसामान्यसह राजकीय लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण झाली आहे. नाशिकमध्ये सर्वात तरुण नगरसेविका ओळख असलेल्या प्रियंका घाटे यांच्या भावाचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रियंका घाटे आणि त्यांच्या समर्थकांनी हॉस्पिटलमध्ये राडा घातला. भाजप नगरसेविका प्रियंका घाटे यांचा भाऊ रोशन घाटे याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कोरोना रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांवर दाखल होणार गुन्हे

नाशिक, 27 एप्रिल: राज्यातील कोरोनाची आकडेवारी चिंताजनक आहे. अशावेळी कोरोनाचे संक्रमण वाढू नये याकरता विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक या शहारांभोवती कोरोनाची विळखा अधिक आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन देखील लागू करण्यात आला आहे. या परिस्थितीत नाशिकमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांची संख्या कमी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

रुग्णाला मृत घोषित केल्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या समर्थकांची हॉस्पिटलमध्ये तोडफोड

पुणे, 26 एप्रिल : हॉस्पिटलच्या दारात कार्डियाक रुग्णवाहिकेतच रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाइकांनी डॉक्टरांना मारहाण करुन हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. पुण्यातील कोंढव्यातील प्राइम हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. राष्ट्रवादी नगरसेवक गफूर पठाण आणि त्यांच्या समर्थकांनी आक्रमक होत ही तोडफोड केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील प्राइम हॉस्पिटलमध्ये डॉ. तोतला हे मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हॉस्पिटलला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

रुग्ण दगावल्याने नातेवाईकांंकडून डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड

पुण्यातील कोंढवा परिसरातील प्राईम हॉस्पिटलमध्ये आणलेला रुग्ण दगावल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड केली. मंगळवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. कोंढवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी पंधरा ते वीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डॉक्टर सिद्धांत उदयकुमार तोतला (वय 25) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेबारा […]

ताज्याघडामोडी

खाजगी रुग्णालयातील उपचाराचे दर नियंत्रणात ठेवा – ना.  विजय वडेट्टीवार

जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून मृत्यूचे प्रमाणात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रुग्णांच्या उपचारासाठी खाटांची संख्या कमी पडत आहे. खाजगी रुग्णालयात कोविड उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून शासनमान्य दराने बिलाची आकारणी होते की नाही ते तपासा व खाजगी रुग्णालयातील उपराचाराचे दर नियंत्रणात ठेवा,असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला दिले. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

10 रुपये मागितले आणि डॉक्टर मॅडमचे मंगळसूत्रच पळवले!

बीड, 01 फेब्रुवारी : डोक्यावर लांब केस, चमचमीत साडी परिधान करून युवक अचानक समोर आला आणि महिला डॉक्टरच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळाला. परंतु, वेळीच डॉक्टरचे सतर्कता दाखवल्याने अवघ्या दहा मिनिटात या चोराला पकडण्यात आले ही घटना बीड (Beed) शहरातील काकू नाना हॉस्पिटलमध्ये (Kaku Nana Hospital beed) भर दुपारी चार वाजता घडली. मोहिनी जाधव असं डॉक्टरचे नाव […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेच्या पतीकडे लाचेची मागणी

माढा तालुक्यातील कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयातील घटना माढा तालुक्यातील वैद्यकीय विभागातून एक मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे. कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संतोष आडगळे यांना 9 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक कविता मुसळे यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी ही कारवाई केली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही 9 हजारांची लाच […]