लग्नानंतर होणाऱ्या वादाला कंटाळून महिलेने पतीपासून घटस्फोट घेतला होता. त्यानंतर महिलेने मित्रासोबत लग्न करण्याचे ठरविले होते. मात्र, घटस्फोट घेतलेल्या नवऱ्याने पुन्हा संसार करण्याच्या तगादा लावल्यामुळे पती आणि प्रियकराच्या त्रासाला कंटाळून महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना 25 ऑगस्टला येरवड्यातील कंजारभाट परिसरात घडली होती. तपासानंतर पोलिसांनी पतीसह एकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अर्पणा अनिल अभंगे […]
गुन्हे विश्व
पंढरपुरात औषध विक्रेत्याच्या घरासमोरून बुलेट लंपास
पंढरपूर शहर व परिसरात गेल्या काही महिन्यापासून सातत्याने मोटारसायकल चोरीस जाण्याचे प्रकार घडत असून कधी गर्दीच्या वेळी वर्दळीच्या रस्त्यावर लावलेले तर कधी घरासमोरून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रकार घडत आहेत.त्यामुळे दुचाकी मालकांमध्ये मात्र मोठी अस्वस्थता दिसून येत असून हॅन्डल लॉक केलेल्या दुचाकीही चोरीस जात असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. असाच एक प्रकार पुन्हा उघडकीस आला असून […]
विवाहित तरुणाची प्रेयसीच्या घरी फाशी, कटकटीला वैतागून संपवलं जीवन
प्रेयसीऐवजी दुसऱ्याच मुलीसोबत लग्न झालेल्या तरुणाने प्रेयसीच्या कटकटीला वैतागून अखेर तिच्याच घरी फाशी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणाचं त्याच्या शेजारीच राहणाऱ्या मुलीवर प्रेम होतं. दोघांनाही एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा होती. मात्र तरुणाचं वेगळ्याच मुलीसोबत लग्न झाल्यामुळे दोघांमध्ये वाद होत होते. या वादांना कंटाळून तरुणाने प्रेयसीच्या घरी जाऊन आत्महत्या केली.
आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्याकडून महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण
पंढरपूर तालुक्यातील पुळूज गावातील ग्रामपंचायत जवळील हायमास वरील लाईट अचानक गेल्याने लाईनची तपासणी करत असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुलाणी गल्ली लिंगेश्वर विद्यालय पुळूज येथे विदुत तारेवर बेकायदेशीररित्या वायरचे हुक टाकुन घेतलेले विदुत कनेक्शन जोडुन घेतल्याचे निदर्शनास आले. यावेळी सदर कर्मचाऱ्यांनी विद्युत वाहक तारेवर टाकलेला आकडा काढण्यास सुरुवात केली असता तेथेच राहणारा ईनुस इलाई मुलाणी हा तेथे […]
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सरकोली येथील दोघांविरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पंढरपूर तालुक्यातील सरकोली परिसरातील भीमा नदीच्या पात्रातून सातत्याने अवैध वाळू उपसा करून त्याची विल्हेवाट मंगळवेढा तालुक्यात लावली जात असल्याची चर्चा होती. याची दखल घेत मंगळवेढा तालुक्यातील महसूल प्रशासनाने नेमलेल्या विशेष पथकाने कारवाई करत दामाजी कारखाना,मुढवी रोड चोरटी वाळु वाहतुकीवर कारवाई करणे करीता पेट्रोलिंग करीत असताना रात्रौ11/00 वा.चे सुमारास टाटा ACE मेगा XL कंपनीची गाडी वाळु वाहतुक […]
20 हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकास रंगेहाथ पकडले
खरेदी खताची प्रत देण्यासाठी 20 हजार रुपयाची लाच घेताना अमरावती पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राजू लेवटकर यास मध्यस्थामार्फत लाच घेताना रंगेहाथ पकडले. अमरावती पोलीस दलातील गाडगेनगर पोलीस ठाण्यात कार्यरत राजू लेवटकर यांनी तक्रारदारांना खरेदी खताची प्रत देण्यासाठी त्यांच्याकडून यापूर्वी तीस […]
भाजप खासदाराला काँग्रेस कार्यकर्त्यांची पाठलाग करून मारहाण
उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील सांगीपूरमधील एका कार्यक्रमावेळी भाजपचे खासदार संगमलाल गुप्ता यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी अक्षरश: गुप्ता यांचा पाठलाग करत त्यांना प्रचंड मारहाण केली. गुप्ता यांना भररस्त्यात पाडून त्यांना लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतल्याने हल्लेखोर पळून गेले. दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच ही मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. […]
जामिनावर सुटताच तुफान गोळीबार, हत्येच्या आरोपातील तरुणाची निर्घृण हत्या
जळगाव : भुसावळ तालुक्यातील नशिराबाद खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या एका संशयित आरोपीची अज्ञात मारेकऱ्यांनी निर्घृणपणे हत्या केली आहे. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे आज (मंगळवारी) सायंकाळी साडेसात राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली ही घटना घडली. या घटनेत हत्या झालेल्या तरुणाचे वडील देखील गंभीर जखमी झाले आहेत. जळगावातून दुचाकीने भुसावळला जात होते धम्मप्रिय मनोहर सुरळकर (वय 19) असे या घटनेतील मृत तरुणाचे […]
गुन्ह्याच्या तपासात मदतीसाठी स्विकारली 10 हजारांची लाच; ASIसह पोलीस नाईक ताब्यात
अपघात प्रकरणी दाखल गुन्ह्यांत तपासात मदत करण्यासाठी सहायक उपनिरीक्षकाने आरोपीकडे दहा हजार रूपयांची मागणी केली. तसेच ती लाच पोलीस नाईक कर्मचार्याच्या हस्ते घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पथकाने सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडले.अभिरूची पोलीस चौकीसमोर मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. श्रीपती माणिक कोलते (वय 55, सहायक पोलीस उपनिरीक्षक) आणि शिवाजी बाळासाहेब जगताप (वय 34, पोलीस […]
बापरे.दुधात चक्क सोयबीन तेल, घातक पॅराफीनची भेसळ; 40 ड्रमसह नाशिकमध्ये एकाला बेड्या
जिल्ह्यातल्या सिन्रर तालुक्यातल्या पाथरे खुर्द गावामध्ये दुधात चक्क सोयाबीन तेल आणि पॅराफीनसारख्या घातक पावडरची भेसळ करून विक्री करणाऱ्यास अन्न भेसळ प्रतिबंधक व सुरक्षा विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.अक्षय गुंजाळ असे आरोपीचे नाव आहे. सिन्नर तालुक्यातल्या पाथरे गावात स्वामी समर्थ दूध संकलन केंद्र आहे. या केंद्रावर दुधाची भेसळ सुरू होती. याची माहिती समजताच अन्न भेसळ प्रतिबंधक […]











