गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

20 हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकास रंगेहाथ पकडले

खरेदी खताची प्रत देण्यासाठी 20 हजार रुपयाची लाच घेताना अमरावती पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राजू लेवटकर यास मध्यस्थामार्फत लाच घेताना रंगेहाथ पकडले. 

अमरावती पोलीस दलातील गाडगेनगर पोलीस ठाण्यात कार्यरत  राजू लेवटकर यांनी तक्रारदारांना खरेदी खताची प्रत देण्यासाठी त्यांच्याकडून यापूर्वी तीस हजार रुपये लाच घेतली होती. त्यानंतर लेवटकर याने रोहन भोपळे याच्या मध्यस्तिने 20 हजार रुपयाची मागणी केली होती. राजू लेवटकर व रोहन भोपळे यांनी तक्रारदारांकडून 20 हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड ,अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत ,संजय महाजन ,एस.एस. भगत मार्गदर्शनाखाली अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *