गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपुरात औषध विक्रेत्याच्या घरासमोरून बुलेट लंपास

पंढरपूर शहर व परिसरात गेल्या काही महिन्यापासून सातत्याने मोटारसायकल चोरीस जाण्याचे प्रकार घडत असून कधी गर्दीच्या वेळी वर्दळीच्या रस्त्यावर लावलेले तर कधी घरासमोरून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रकार घडत आहेत.त्यामुळे दुचाकी मालकांमध्ये मात्र मोठी अस्वस्थता दिसून येत असून हॅन्डल लॉक केलेल्या दुचाकीही चोरीस जात असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

असाच एक प्रकार पुन्हा उघडकीस आला असून टाकळी रोड परिसरातील रहिवाशी मेडिकल दुकानदार मनोज बबनराव वास्ते यांनी त्यांची बुलेट गन मेटल ग्रे रंगाची मोटर सायकल नं. MH13DL5162 ही दिनांक 21/09/2021 रोजी राञी 10/30वा चे सुमारासहँन्डललाँक करून घरासमोर लावली होती.सकाऴी 06/00वा चे सुमारास ते बाहेर आलो असता बुलेट मोटारसायकल दिसुन आली नाही.म्हणुन मी आजुबाजुस शोध मी व माझे भाऊ महेश बबनराव वास्ते तसेच माझे मिञ अजिंक्य दत्तात्रय इंदापूरकर व पार्थ गोपाळराव बेणारे यानी पंढरपुर शहरात व इतरत्र शोध घेतला परंतु ती मिऴुन आली नाही.या प्रकरणी वास्ते यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *