

पंढरपूर तालुक्यातील पुळूज गावातील ग्रामपंचायत जवळील हायमास वरील लाईट अचानक गेल्याने लाईनची तपासणी करत असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुलाणी गल्ली लिंगेश्वर विद्यालय पुळूज येथे विदुत तारेवर बेकायदेशीररित्या वायरचे हुक टाकुन घेतलेले विदुत कनेक्शन जोडुन घेतल्याचे निदर्शनास आले.
यावेळी सदर कर्मचाऱ्यांनी विद्युत वाहक तारेवर टाकलेला आकडा काढण्यास सुरुवात केली असता तेथेच राहणारा ईनुस इलाई मुलाणी हा तेथे येवुन तुम्ही मी विदुत तारेवर टाकलेला हुक का काढत आहे असे म्हणुन तुम्ही हुक काढणारे कोण असे म्हणत या कर्मचाऱ्यांना सर्वांना शिवीगाळी दमदाटी करू लागला. यावेळी महावितरणचे कर्मचारी फिर्यादी सतिश बजरंग जगताप यांना ईनुस इलाई मुलाणी याने शिवीगाळी करून लाथाबुक्याने मारहाण करून ढकलुन दिले.त्यावेळी अतुल माणिक कदम याने आमची सोडवा सोडव केली.
या प्रकरणी ईनुस इलाई मुलाणी याच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात भादंवि ३५३ सह विविध कलमांतर्गत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.